23.1 C
New Delhi
Friday, November 22, 2024
Homeदेश-विदेशआता वाहन चालकांना फास्ट टॅग नाही

आता वाहन चालकांना फास्ट टॅग नाही

नवीन टोल धोरणाला मान्यता

आता तुम्हाला टोल टॅक्स भरण्यासाठी कोणत्याही टोल गेटवर थांबावं लागणार नाही. कारण आता उपग्रहावर आधारित टोल प्रणालीला सरकारनं मान्यता दिली आहे. सुरुवातीला तुम्हाला दोन्ही पर्यायाचा वापर करता येणार आहे. यामध्ये फास्टॅग आणि सॅटेलाइट प्रणालीचा समावेश असेल.रस्ते आणि वाहतूक मंत्रालयानं राष्ट्रीय महामार्गावरील टोल नियमात बदल केले आहेत. यासह देशात उपग्रहावर आधारित टोल वसुली प्रणालीला मान्यता देण्यात आली आहे. आता ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS), ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (GPS) आणि ऑन बोर्ड युनिट्स (OBU) यांचा वापर टोल वसुलीसाठी केला जाईल. यानुसार राष्ट्रीय महामार्गावर दररोज 20 किमी अंतरापर्यंत जीएनएसएस वाहनांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. 20 किमीपेक्षा जास्त अंतरासाठी टोल आकारला जाईल. सध्या फास्टॅगचा वापर सुरू राहणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग शुल्क (निर्धारित आणि दरांचं संकलन) नियम, 2008 मध्ये सुधारणा केली. यामध्ये उपग्रह-आधारित प्रणालीच्या मदतीनं इलेक्ट्रॉनिक टोल संकलनाचा समावेश करण्यात आला आहे.

उपग्रह आधारित टोल संकलन प्रणालीसाठी, कार किंवा इतर वाहन चालकांना कोणत्याही टोल प्लाझावर थांबण्याची आवश्यकता नाही. कारमध्ये बसवलेल्या सिस्टममधून पैसे आपोआप कापले जातील. तथापि, FASTag प्रणाली बंद केली जाईल, की नाही याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही.जर FASTag ब्लॉक झाला किंवा काम करत नसेल, तर टोल प्लाझावर रोख पेमेंटच्या स्वरूपात दुप्पट टोल टॅक्स भरावा लागतो. तसंच उपग्रह आधारित टोल वसुली प्रणालीमध्येही असाच नियम आहे. त्यासाठी स्वतंत्र लेन असेल, त्यात जीपीएस नसलेले वाहन आल्यास दुप्पट टोल आकारला जाईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
23.1 ° C
23.1 °
23.1 °
46 %
1kmh
0 %
Fri
25 °
Sat
28 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!