पुणे : फोनपेने जारसोबत आज आपली भागीदारी जाहीर केली आहे, यामुळे या प्लॅटफॉर्मवर ‘डेली सेव्हिंग्स/दैनंदिन बचत’ ऑफर करणारे नवीन उत्पादन लाँच केले जाईल. या नवीन सेवेमुळे युजरना वाढत्या प्रमाणात दैनंदिन योगदानाद्वारे २४ कॅरेट डिजिटल सोन्यात पैशांची करता येणार आहे. या डिजिटल सोन्याच्या दैनंदिन बचतीत युजर दररोज रु. १० इतके कमीत कमी पैसे ठेवू शकतात, तर जास्तीत जास्त रु. ५,००० पर्यंत पैसे ठेवू शकतात. यामुळे लोकांना नियमितपणे बचत करण्याची सवय लागू शकते.
हे उत्पादन जारच्या एकीकृत गोल्ड टेक सोल्यूशनद्वारे समर्थित आहे, याद्वारे केवळ ४५ सेकंदांत डिजिटल सोने गुंतवणूक प्रक्रिया सुलभ केली जाते. त्यांच्या इकोसिस्टममधील युजर्ससाठी खास जार्स गोल्ड टेक स्टॅक आता भागीदार व्यवसायांसाठी उपलब्ध असून, यामुळे ते त्यांच्या युजरना डिजिटल सोन्यात बचत करण्याची क्षमता प्राप्त होते. फोनपेच्या सध्याच्या पेमेंट इकोसिस्टमसह जारने एकत्र येण्यामुळे पैसे ट्रान्सफर अधिक सोपे आणि खात्रीचे होते
इनॲप कॅटेगरीजच्या कन्झ्युमर पेमेंट्सच्या प्रमुख निहारिका सैगल म्हणाल्या, “आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर अलीकडे लक्षणीय प्रमाणात डिजिटल सोने स्वीकारले जात असल्याचे पाहात आहोत. रोजच्या बचतीत उपयुक्त ठरेल अशा दैनंदिन बचतीत २४ कॅरेट डिजिटल सोने हे महत्त्वाचे उत्पादन सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. लहान सुरुवात करून आणि सातत्याने बचत करून, व्यक्ती त्यांची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उत्तरोत्तर कार्य करू शकतात.”
जारचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निश्चय एजी म्हणाले. “आम्ही आमच्या स्वतःच्या प्लॅटफॉर्मच्या पलीकडे जारच्या क्षमतांचा विस्तार करण्यास आणि सोन्याच्या बचतीभोवती ३६० अंशात सेवा ऑफर करण्यास उत्सुक आहोत, तसेच युजरना आमच्या इनहाऊस ब्रँड, नेकद्वारे त्यांच्या बचतीचे दागिन्यांमध्ये रूपांतर करण्यास सक्षम बनवण्यास सक्षम आहोत फोनपेला आमचे गोल्ड टेक प्लॅटफॉर्म ऑफर करून, आम्ही ब्रँड्सना त्यांच्या सेवांमध्ये सोन्याची बचत अमर्यादित एकीकृत करण्यास सक्षम करत आहोत. हा जारसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. कारण आम्ही व्यवसाय आणि लोक यांना आर्थिक स्वास्थ लाभावे यासाठी सोप्या, स्केलेबल सोल्यूशन्ससह सशक्त करत आहोत, या उत्पादनामुळे सोन्याची बचत नेहमीपेक्षा सोपी होते.”
फोनपे आघाडीच्या आणि विश्वासू भागीदारांकडून ९९.९९% शुद्धता प्रमाणित २४ कॅरेट डिजिटल सोने ऑफर करते, भारतातील १९,००० पेक्षा जास्त पोस्टल कोडमधील १. २ कोटी ग्राहकांनी फोनपे प्लॅटफॉर्मवर पारदर्शक किमतीत उच्च शुद्धतेचे २४ कॅरेट सोने खरेदी केले आहे.