25.2 C
New Delhi
Monday, August 25, 2025
Homeमहाराष्ट्रभोसरी विधानसभा मतदार संघात भाजपाची संघटनात्मक मोर्चेबांधणी

भोसरी विधानसभा मतदार संघात भाजपाची संघटनात्मक मोर्चेबांधणी

– निगडी चिखली मंडल पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
– पक्ष संघटन मजबूत करण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना


पिंपरी – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाने ‘मायक्रो प्लानिंग’ सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मंडल पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपाची संघटनात्मक मोर्चेबांधणी सुरू असून, निगडी चिखली मंडल पदाधिकाऱ्यांना भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरामध्ये शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने संघटनात्मक मोर्चेबांधणी करून या संघटनाच्या माध्यमातून निवडणुकांना सामोरे जाण्याचे भाजपाचे धोरण आहे. त्यानुसार रविवारी आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते निगडी चिखली मंडल पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी भोसरी विधानसभा विस्तारक दीपक रजपूत, सरचिटणीस अजय पाताडे, माजी नगरसेवक उत्तम केंदळे,  कमलताई घोलप, योगिता नागरगोजे, सुरेश म्हेत्रे, दिनेश यादव, पांडुरंग भालेकर, शांताराम बापू भालेकर, धनंजय वर्नेकर, अस्मिता भालेकर, कविता हिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

निगडी चिखली मंडलाच्या रविवारी केलेल्या नियुक्त्यांमध्ये गिरीश देशमुख यांची युवा मोर्चा मंडल अध्यक्षपदी निवड केलेली आहे. उपाध्यक्षपदी रवी पाटोळे, अनिल वाणी यांचा समावेश आहे. मंडलाच्या कामगार आघाडीपदी धनाजी मोरे, सरचिटणीसपदी चंद्रकांत शेडगे, प्रभाग अध्यक्षपदी रवींद्र कुकडे, उपाध्यक्षपदी अभिजीत जोशी, तर सरचिटणीस म्हणून सागर देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय मनीष चुडासमान यांची उपाध्यक्षपदी तर गोरख पाटील, अजिंक्य नलावडे , हरजीत बारडा यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. मंडलाच्या चिटणीसपदी गणेश अवघडे आणि गणेश नागवडे यांची निवड करण्यात आली आहे. प्रभाग उपाध्यक्षपदी सुधीर कांबळे, सदस्य मंडल पदी सुनील कांबळे, उपाध्यक्षपदी दिलीप पवार तसेच ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी संतोष लष्करे यांची निवड करण्यात आली आहे. मंडलाच्या प्रसिद्धी प्रमुखपदी राकेश बावणे, उत्तर भारतीय आघाडीपदी कुंदन कुमार सिंह, उपाध्यक्षपदी प्रशांत कदम, चिटणीसपदी संतोष निकाळजे आणि सोमनाथ बिरजे यांची निवड केली आहे. सोमनाथ मेमाणे यांची प्रभाग 12 मध्ये अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी शिरीष उत्तेकर बापू मारणे यांची निवड करण्यात आली आहे.मनोज भालेकर हे सरचिटणीस म्हणून काम पाहणार आहेत.


भारतीय जनता पार्टी ही संघटनात्मक पद्धतीने काम करते. सूक्ष्म नियोजन करून मंडल पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असतो. या माध्यमातून पक्षाची ध्येय धोरणे नागरिकांपर्यंत पोहोचतात. नागरिकांच्या समस्या जाणून घेता येतात. यातून संवाद घडतो. या दृष्टीने या सर्व मंडल पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या मंडल पदाधिकाऱ्यांनी पक्षाची ध्येय धोरणे जनमानसात पोहोचावी अशा सूचना या पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत. एकजुटीने, एक दिलाने भाजपासाठी प्रत्येकजण काम करणार आहे. प्रथम राष्ट्र, मग देश आणि नंतर आपण या धोरणानुसार झोकून देऊन पक्ष संघटना पक्ष मजबूत करायचा आहे, अशा सूचना या मंडल पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.
महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, पिंपरी-चिंचवड.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
25.2 ° C
25.2 °
25.2 °
77 %
4.2kmh
15 %
Sun
29 °
Mon
31 °
Tue
35 °
Wed
37 °
Thu
37 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!