28 C
New Delhi
Monday, August 25, 2025
Homeदेश-विदेशरतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची राज ठाकरे यांची मागणी

रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची राज ठाकरे यांची मागणी

रतन टाटा यांचं मुंबईत काल निधन झाल्याचं वृत्त येताच अनेक सामान्य भारतीय हळहळ व्यक्त करत आहे. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रतन टाटांच्या पार्थिव दर्शनानंतर X वर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना एक पत्र लिहित टाटांना मरणोत्तर भारतरत्न (Bharat Ratna) पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी ‘अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच ‘भारतरत्न’सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं असंही ते म्हणाले आहेत. तसंच एखाद्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती शारीरिक जर्जर अवस्थेत असताना होतो, हे योग्य नाही. या विषयी काही निश्चित धोरण आपण आखाल याची मला खात्री आहे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.’ असं म्हटलं आहे.

दरम्यान आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देखील केंद्राकडे रतन टाटा यांना भारतरत्न देण्यात यावा यासाठीचा प्रस्ताव संमत झाला आहे. रतन टाटा यांना केंद्र सरकार कडून पद्म विभूषण हा पुरस्कार देण्यात आला आहे. पण त्यांचा सन्मान ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने व्हावा अशी मागणी आता जोर धरत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
28 ° C
28 °
28 °
82 %
3.7kmh
100 %
Mon
28 °
Tue
35 °
Wed
35 °
Thu
36 °
Fri
34 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!