महा सायबर-महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट’चे (MahaCyber-Maharashtra Cyber Security Project) महापे, नवी मुंबई येथे उदघाटन झाले. यासोबतच सायबर गुन्ह्यांवर त्वरित कारवाईसाठी 14407 हा हेल्पलाईन क्रमांकदेखील लॉंच केला. काळाची पावले ओळखत 2017-18 मध्ये सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ‘महा सायबर-महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट’ची सुरुवात केली होती. 2019 मध्ये सरकार बदलल्यावर हा प्रकल्प ‘कपाटबंद’ झाला. परंतु पुन्हा सरकार आल्यावर या प्रोजेक्टला पुढे नेण्याचे काम झाले. महाराष्ट्र भारताची फिनटेक राजधानी आहे. ‘तंत्रज्ञान सुसज्ज पोलीसिंग’मध्येही महाराष्ट्राला आघाडीवर नेण्याचे काम हे सेंटर करणार आहे. यामार्फत येत्या काळात भारतातील सर्वात मोठे प्रशिक्षित पोलीस दल महाराष्ट्राकडे असेल.’Learn, unlearn आणि relearn’ हा 21 व्या शतकाचा मंत्र आहे. तंत्रज्ञान नेहमी बदलत असते, त्यामुळे तंत्रज्ञानातील प्रणाली हाताळणारे लोक गतिमान असायला हवेत. या केंद्रामार्फत दरवर्षी 5000 पोलिसांना प्रशिक्षित करण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे डिजिटल भविष्य अधिक सुरक्षित होणार आहे. या केंद्राच्या मार्फत खासगी कामे घेणे शक्य असल्याने महसूल प्रवाह तयार होऊ शकतो, असेही फडणवीस यांनी यावेळी सुचवले.
सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल
'तंत्रज्ञान सुसज्ज पोलीसिंग'मध्येही महाराष्ट्राला आघाडीवर नेण्याचे काम हे सेंटर करणार
RELATED ARTICLES
New Delhi
overcast clouds
27.3
°
C
27.3
°
27.3
°
88 %
3.7kmh
100 %
Mon
27
°
Tue
35
°
Wed
35
°
Thu
36
°
Fri
34
°