30.6 C
New Delhi
Friday, October 10, 2025
HomeTop Five Newsनियाेजनबध्द विकासकामे केल्यानेच पर्वती मतदारसंघाचा सर्वांगीण विकास - आ. मिसाळ

नियाेजनबध्द विकासकामे केल्यानेच पर्वती मतदारसंघाचा सर्वांगीण विकास – आ. मिसाळ

पुणे- पुणे शहरातील पर्वती मतदारसंघात मागील १५ वर्ष मी नियाेजनबध्द काम केले असल्याने मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला आहे. मतदारांनी साथ दिल्याने पायाभूत सुविधाच्या निर्मितीसाेबत विकसित मतदारसंघ म्हणून पर्वतीकडे पाहिले जाते. यावेळी देखील सदर मतदारसंघातून निवडणुक लढविण्यासाठी मी इच्छुक असून पुढील पाच वर्षाचा विकास आराखडा देखील मी तयार केला असल्याची माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पर्वती मतदारसंघात मागील १५ वर्षात केलेल्या विकासकामा बाबत माहिती देताना मिसाळ म्हणाल्या, पाणीपुरवठा, रस्ते, वीज, वाहतूक काेंडीतून नागरिकांची सुटका आदी प्रश्नांवर चांगल्याप्रकारे काम करता आले आहे. स्वारगेट, सिंहगड रस्ता येथील उ्डडाणपुलांमुळे सदर भागातील वाहतूक काेंडी कमी झाली आहे. नदीपात्रातील रस्त्यास देखील मंजूरी मिळाली आहे. स्वारगेट यथील मल्टी माॅडेल हब मेट्राेच्या माध्यमातून तयार हाेत असून त्याद्वारे शहराच्या मध्यवर्ती भागातील सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था एकत्रित जाेडण्यात आल्या आहे. स्वारगेट ते कात्रज दरम्यान भूमिगत मेट्राे प्रकल्पास मंजूरी मिळून त्याचे भूमिपूजन झाले आहे. सिंहगड रस्त्यावरील नियाेजित मेट्राे मार्गाच्या दृष्टीने उड्डाणपुलासाेबत मेट्राे खांब देखील उभारणी करण्यात आली आहे. पर्वती, तळजाई टेकडी याठिकाणी पर्यावरण वाचावे यादृष्टीने विकासकामे करत तळजाई टेकडीवर सुमारे २५० हेक्टर मध्ये सीमाभिंत बांधून ते क्षेत्र सुरक्षित करण्यात आले आहे. पर्वती येथे एैतिहासिक संग्रहालय निर्मिती करण्याचे काम प्रस्तावित आहे.

बिबवेवाडी याठिकाणी ५०० बेडचे माेठे रुग्णालय उभारणी सुरु असून त्यापैकी १०० बेडचे रुग्णालय सुरु करण्यता आले आहे. माझ्या मतदारसंघात माेठया प्रमाणात झाेपडपट्टी असल्याने सुरक्षितेच्या कारणामुळे अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहे. शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असताना, अनेक भागात पाेलीस स्टेशन दूर असल्याने याच हेतूने स्मार्ट पाेलीसींगसाठी कॅमेऱ्याचा वापर करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
30.6 ° C
30.6 °
30.6 °
28 %
3.2kmh
0 %
Fri
30 °
Sat
31 °
Sun
33 °
Mon
33 °
Tue
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!