पुणे : फटाक्यांमुळे होणारे अपघात लक्षात घेऊन, फोनपेने दिवाळीच्या काळात अशा अपघातांसाठीचे सर्वसमावेशक संरक्षण आणि युजर्सना परवडणारा नवीन इन्शुरन्स प्लॅन सुरू करण्याची घोषणा केली आहे. कव्हरेज प्लॅन,९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे, फटाक्यांशी संबंधित कोणत्याही अपघातांपासून संरक्षण करण्यासाठी फोनपे युजरना सणासुदीच्या कालावधीत १० दिवसांसाठी २५,००० रुपयांपर्यंत सर्वसमावेशक कव्हरेज देते. हा प्लॅन लाँच केल्यामुळे देशभरातील युजर सण सुरक्षितपणे आणि मानसिक शांतीसह साजरा करू शकतात, कारण या प्लॅनमुळे अपघात झाल्यास विमाधारकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावा लागल्याचा खर्च आणि अपघाती मृत्यूच्या खर्चापासून आर्थिक संरक्षण मिळते.
देशभरात सणासुदीच्या काळात फटाक्यांशी संबंधित दुखापतींच्या घटना घडतात, अशा अनपेक्षित घटनांमुळे आर्थिक भारही वाढतो, हा भार कमी व्हावा यासाठी फोनपेने हे उत्पादन सादर केले आहे. फायरक्रॅकर इन्शुरन्स प्लॅन हा २५ ऑक्टोबर २०२४ पासून फक्त ९ रुपये इतक्या परवडणाऱ्या किमतीत १० दिवसांचे कव्हरेज देतो. फोनपे ॲपवर एका मिनिटात खरेदी करता येणारा हा प्लॅन, युजर, त्यांचा जोडीदार आणि २ मुले अशा ४ कुटुंब सदस्यांचा विमा करून सर्वसमावेशक कौटुंबिक कव्हरेजदेखील देते. जर युजरने हा प्लॅन २५ ऑक्टोबर नंतर खरेदी केला, तर पॉलिसी कव्हर खरेदी तारखेपासून सुरू होईल. हे अल्प-मुदतीचे कव्हरेज विशेषत: सणासुदीच्या हंगामासाठी तयार केले आहे, हा प्लॅन युजरना परवडणारा आणि वेळेवर संरक्षण देणारा प्लॅन आहे.
या लाँचविषयी बोलताना, फोनपे इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल गुप्ता म्हणाले, की “सणासुदीच्या वेळेत फोनपे चा फायरक्रॅकर इन्शुरन्स सादर करण्यास आम्ही उत्सुक आहोत. हे कव्हरेज कुटुंबांना अत्यावश्यक संरक्षण देते, विमाधारक अपघात किंवा अनपेक्षित आर्थिक ताणांबद्दलच्या चिंतेपासून पूर्ण मनःशांतीने उत्सव साजरा करू शकतात, याची खात्री देते. इन्शुरन्स परवडणारा आणि सुलभ दोन्ही असावा, हे आमचे ध्येय आहे, ज्यामुळे प्रत्येकाला सणांचा सुरक्षितपणे आनंद घेता येईल.”