24.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानबिर्ला ओपस पेंट्सने आपल्या ‘नए जमाने का नया पेंट’

बिर्ला ओपस पेंट्सने आपल्या ‘नए जमाने का नया पेंट’

पुणे १५ ऑक्टोबर २०२४: या वर्षाच्या सुरुवातीला डेकोरेटिव्ह पेंट्स क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर आदित्य बिर्ला ग्रुपच्या ग्रासिम उद्योगांतर्गत येणाऱ्या बिर्ला ओपस पेंट्सने आता ‘नए जमाने का नया पेंट’ म्हणजेच नवीन काळासाठी नवीन पेंट हे अभियान नुकतेच सुरू केले आहे. लिओ बर्नेट इंडियाच्या संकल्पनेतून जन्मलेल्या या फिल्ममध्ये विकी कौशल आणि रश्मिका मंदाना हे भारतातील सध्याचे दोन मोठे आणि लोकप्रिय कलाकार, ब्रॅंड अम्बॅसडर या नात्याने या ब्रॅंडच्या अनोख्या आणि विशेष गुणांविषयी आणि गुणवत्तेविषयी बोलताना दिसतात. त्या दोघांव्यतिरिक्त या फिल्ममध्ये नीना गुप्ता आणि सौरभ शुक्ला हे दोन ज्येष्ठ अभिनेते देखील आहे. आगळीवेगळी संकल्पना, मोठे कलाकार आणि सुंदर मांडणी यामधून बिर्ला ओपस पेंट्स ‘नवीन’ आणि ‘आकर्षक’ असल्याचे भारपूर्वक सांगितले आहे.

हे अभियान हिंदी आणि सर्व मोठ्या प्रादेशिक भाषांमधून चालवण्यात येणार आहे आणि टीव्ही, डिजिटल ओओएच, प्रिंट आणि रेडियो अशा सर्व माध्यमातून त्याचा प्रचार करण्यात येणार आहे, जेणेकरून लोकांना या उत्पादनाविषयी माहिती मिळेल आणि त्यांना हे उत्पादन वापरावेसे वाटेल.

या अभियानाविषयी टिप्पणी करताना बिर्ला ओपस पेंट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रक्षित हरगवे म्हणाले, “या सणासुदीच्या मोसमात लॉन्च होत असलेल्या आमच्या ‘नए जमाने का नया पेंट’ या अभियानातून एका जबरदस्त कलाकार संचाच्या माध्यमातून आम्ही आमच्या उत्पादनाची वैशिष्ट्ये दाखवणार आहोत. या अभियानात विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांची युवा ऊर्जा आणि सौरभ शुक्ला व नीना गुप्ता यांचा कालातीत मोहकपणा एकवटला आहे. आम्हाला आत्मविश्वास वाटतो की आमची कल्पकता आणि प्रेरक दृष्टिकोन दर्शविणारे हे अभियान उपभोक्त्यांना आपलेसे वाटेल!”

बॉलीवूड सुपरस्टार विकी कौशलने नमूद केले, “बिर्ला ओपस पेंट्स परिवारात सहभागी होताना मी रोमांचित झालो आहे. आणि या अभियानातून उपभोक्त्यांच्या जीवनात उत्साह आणि रंग भरण्यासाठी मी आतुर आहे. हे अभियान खूप वेगळ्या पद्धतीने आणि कलात्मकतेने या फिल्म्समधून साकार केले आहे. सौरभ शुक्ला या वरिष्ठ अभिनेत्यासोबत या जाहिरातीचे शूटिंग करताना मला खूपच मजा आली. शूटिंग करताना त्यांचे इंप्रोव्हाईझेशन बघणे ही एक पर्वणी होती!”

पॅन इंडिया स्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना म्हणाली, “मला वाटते बदलत्या काळानुरूप आपणही बदलले पाहिजे. माझ्या या विचारांचे प्रतिबिंब बिर्ला ओपस पेंट्सच्या नवीन अभियानात उमटलेले दिसते की, ‘तुम्हाला असलेल्या माहितीच्या आधारे पर्याय निवडा, सामान्य चलन पाहून नाही!’ अम्बॅसडर म्हणून बिर्ला ओपसशी संलग्न होताना मला आनंद वाटत आहे. आणि नीनाजींसोबत ही जाहिरात करण्याचा अनुभव फार छान होता. बिर्ला ओपस पेंट्सशी माझे हे नाते अधिकाधिक दृढ होत जाईल अशी मला आशा आहे.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
24.1 ° C
24.1 °
24.1 °
31 %
1.5kmh
0 %
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °
Mon
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!