पुणे- एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, पं. वसन्तराव गाडगीळ हे ऋषितुल्य व्यक्तीमत्व होते. असे व्यक्ती समाजाच्या कल्याणासाठी कार्य करु शकतात. त्यांच्याकडून त्याग, समर्पण, सेवाभाव आणि साधेपणा शिकला पाहिजे. समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य घालविले आहे. त्यांचा आदर्श व त्यांचे विचार आचरणात आणून कार्य केल्यास त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, पं. वसन्तराव गाडगीळ आणि आमचे घरघुती संबंध होते.पं. गाडगीळ यांनी शेवटच्या श्वासापर्यंत संस्कृतचा प्रसार आणि प्रचार करण्यास मोलाचे योगदान दिले आहे. विद्यापीठाच्या विकासामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या जाण्यामुळे विद्यापीठाचे कधीही न भरुन निघणारी हानी झाली आहे.