28 C
New Delhi
Friday, October 10, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानबायोटेक्नोलॉजी मध्ये उज्ज्वल भविष्यतज्ज्ञांचा सल्लाः

बायोटेक्नोलॉजी मध्ये उज्ज्वल भविष्यतज्ज्ञांचा सल्लाः

अलार्ड विद्यापीठात पॅरामेडिकल सायन्स आणि बायोटेक्नॉलॉजीमधील संधी आणि अलीकडील ट्रेंड वर कार्यशाळा

पुणे – ” रेडिओलॉजी क्षेत्र हे आरोग्य सेवेच्या जगात सर्वात विकसित क्षेत्रांपैकी एक मानले जाते. वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकर्‍या उपलब्ध असून भविष्यात रोजगारामध्ये झापाट्याने वाढ होण्याची अपेक्षा आहे. पॅरामेडिकल आणि बायोटेक्नोलॉजी क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे ज्ञान केवळ समृद्ध करत नाही, तर आरोग्य आणि विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या संभाव्य करिअरच्या मार्गाचा शोध घेण्यासाठी त्यांना प्रेरणाही देत.” असे मत जैवतंज्ञज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.
‘हम अलग है, हम अलार्ड है ’ या बोध वाक्याने शैक्षणिक वर्षाची सुरूवात करत अलार्ड स्कूल ऑफ हेल्थ अँड बायोसायन्सच्या वतीने अलार्ड विद्यापीठातील या कार्यशाळेत ‘पॅरामेडिकल सायन्स आणि बायोटेक्नॉलॉजीमधील संधी आणि अलीकडील ट्रेंड’ या विषयी सहभागींनी मते मांडली.
या कार्यशाळेत जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. अभिजीत, संजी सिंग व प्रमोद आदी वक्ते सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलार्ड विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलपति डॉ. एल.आर. यादव होते.
तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पूनम कश्यप आणि शाळेचे डीन डॉ. अजय कुमार जैन उपस्थित होते.
उपस्थित वक्त्यांनी रूग्णालये, संशोधन आणि विकास, कॉर्पोरेट कंपन्या अशा विविध क्षेत्रात पॅरामेडिकल क्षेत्रात उपलब्ध असलेल्या विविध संधींवर चर्चा केली. त्यांनी उद्योगाला आकार देणारे नवीनतम ट्रेंड आणि पॅरामेडिकल आणि बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील अफाट संधींवर प्रकाश टाकला.
डॉ. एल.आर. यादव म्हणाले,” येथे नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे विद्यार्थी तयार होतील. कठोर परिश्रम, प्रामाणिकता, व्यावहारीक ज्ञान असल्याशिवाय यशस्वी होता येत नाही. जीवनात प्रगती साधायची असेल तर आई वडिलांची सेवा आणि कष्ट करण्याची ताकत अंगी बाळगा.”
डॉ. पूनम कश्यप म्हणाल्या,” ज्ञानाच्या आधारे विद्यार्थ्यांच्या करियरला आकार दिला जाईल. शारीरिक व मानसिक सशक्त बनविण्यासाठी येथील अनुभवी शिक्षक व त्यांच्या ज्ञानाचा योग्य वापर करू. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी नवनिर्मिती, संशोधन व प्रकल्पांवर आधारित शिक्षण दिले जाईल.”
आयोजित कार्यशाळेत १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डॉ. सविता पेटवाल, आशिष व रितू यांनी अथक परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
28 ° C
28 °
28 °
34 %
2.2kmh
0 %
Fri
28 °
Sat
31 °
Sun
33 °
Mon
33 °
Tue
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!