“देशमुख”
देशमुख या नावाला फार जुना, पारंपरिक,कर्तृत्ववान वारसा व वलय आहे.
देश म्हणजे क्षेत्र-विभाग आणि मुख म्हणजे चेहरा-ओळख.
लातूरकडील देशमुख म्हणजे रुबाब,रुतबा आणि नावाला शोभेसे कर्तुक.
राजकारण आणि कलाक्षेत्रात “देशमुख” हे नाव फार आदराने घेतले जाते कारण विलासरावजी देशमुख असोत की रितेश देशमुख असो यांनी आपापल्या क्षेत्रात जपलेला सभ्यपणा लातूरला आणि महाराष्ट्राला देशविदेशात नावाजून गेला..
रितेश देशमुख यांच्यामुळे लातूरमध्ये कला खूपच जोपासली व फोफावत चालली आहे.
सगळ्या महाराष्ट्र लातूरकडे आशेने व आदराने बघत आहे.आणि लातूरकर या विश्वासावर खरे उतरतील कारण लातूरचाच आणखी एक “देशमुख” चित्रपट श्रुष्टीत हळूहळू आपली मुळे दमदारपणे पसरवत आहे.
“अहमद देशमुख”…
नाम तो सुना ही होगा.
तोच अहमद देशमुख ज्याने “ढिशक्याव” सारख्या मराठी चित्रपटाची निर्मिती करत अभिनय क्षेत्रात भीमपाऊल टाकले आणि चित्रपट सृष्टी व महाराष्ट्राचे लक्ष कला क्षेत्रातील लातूरच्या खाणीकडे आकर्षीत झाले.
कौतुकाची व अभिमानाची ही गोष्ट होती की चित्रपट निर्माता असूनही अहमदने स्वतःला फालतू अहंकारात अडकू न देता तो अन्य प्रोडक्शनसाठी लिनतेने ऑडिशन देत होता.
परिमाणतः त्याने अभिनय केलेला दुसरा चित्रपट आला “आल्याड पल्याड”.
“आल्याड पल्याड” ने कमाल केली.सलग महिनाभर रजत पडदा सोडला नाही.
अहमदचा अभिनय जाणकारांच्या नजरेत भरला आणि निर्माता-अभिनेता या ओळखीतून अभिनेता स्वावलंबी झाला.
अहमद फार लवकरच पुढील टप्प्यात पोहचला.या पोहचण्यात घाई नव्हती तर गती होती.
अहमदचा आणखी एक मराठी/हिंदी चित्रपट “कर्मयोगी आबासाहेब” २५ ऑक्टोबरला जगभर प्रदर्शित होतोय. स्वर्गीय मा. आमदार गणपतराव देशमुख यांच्या विश्वासू साथीदाराच्या भूमिकेत तो आपल्या समोर येतोय.जी भूमिका करण्यासाठी कित्येक बड्या व नामांकित अभिनेत्यांनी लेखक/दिग्दर्शकाला सकाळी, दुपारी, संध्याकाळी,रात्री मेसेजचे रतीब मोबाईलवर घातले होते ती भूमिका अहमदला मिळावी ही लातूरच्या कष्टाळू मातीचा आणि देशमुख या आडनाव साधर्म्यचा अनोखा संयोग म्हणावा लागेल.
अहमदचे आणखी काही चित्रपट कलाकार व निर्माता म्हणून लवकरच महाराष्ट्राच्या सजग व चोखंदळ प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत.
रितेश देशमुख यांच्या नंतर अहमद देशमुख यांच्याकडे महाराष्ट्राच्या व देशाचे लक्ष असणार हे नक्की.
कर्मयोगी आबासाहेब चित्रपटांमध्ये अहमद देशमुख निभावणार महत्त्वाची भूमिका
RELATED ARTICLES
New Delhi
overcast clouds
28
°
C
28
°
28
°
82 %
3.7kmh
100 %
Mon
28
°
Tue
35
°
Wed
35
°
Thu
36
°
Fri
34
°