पुणे : सर्वोत्तम फळांपासून बनविलेले ताजे नैसर्गिक पल्प असलेले ताज इंडिया ग्रुपचे ‘रायना ज्युसेस’ आता पुण्यात देखील उपलब्ध होणार आहेत. युरोपमध्ये निर्यात केलेल्या ‘रायना ज्युसेस’ला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर पुणे आणि मुंबई सह भारतातही पाच मुख्य राज्यांमध्ये रायना ज्युसेस आता उपलब्ध आहेत. उत्तम दर्जाची फळे आणि कोल्ड प्रेस प्रक्रियेमुळे रायना जूस ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरत आहेत. पुणेकरांसाठी ‘रायना ज्यूस’ उपलब्ध करून देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे, अशी भावना ताज इंडियन ग्रुप चे मालक हरप्रीत सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी गोरत्ना ऑर्गेनिक अँड नॉचरल्स चे मालक योगेश अटल उपस्थित होते. पुण्यातील सहा वितरणकर्त्यांशी ‘रायना ज्युसेस’ च्या वतीने भागीदारी करण्यात आली आहे. ज्यामुळे ग्राहकांना सहजपणे रायना ज्युसेस उपलब्ध होईल. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम कुमार, सेल्स प्रतिनिधी कौस्तुभ गाडे देखील उपस्थित होते.
गौतम कुमार म्हणाले, युरोपीय खाद्य मानाकांचे पालन करून ‘रायना ज्युसेस’ भारतात तयार केले जातात. सर्वोत्तम फळांपासून ताजे नैसर्गिक पल्प ने तयार केलेले हे ज्युसेस आहेत. आमच्या उत्पादनाने युरोपमध्ये चांगली लोकप्रियता मिळवली आहे आणि भारतीय ग्राहकांना तोच अनुभव देण्याचा आमचा उद्देश आहे.
रायना ज्यूस चे सेल्स हेड अनिरुद्ध चौधरी म्हणाले, ‘रायना ज्युसेस’च्या माध्यमातून आरोग्यदायी आणि उत्कृष्ट दर्जाचे पेय ग्राहकांना उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. आम्ही ताज इंडियन ग्रुपचे आंतरराष्ट्रीय मानांकन असलेले जागतिक दर्जाचे ‘रायना ज्युसेस’ पुण्यात घेऊन आलो आहोत याचा विशेष आनंद होत आहे.
ताज इंडियन ग्रुप भारतीय बाजारपेठेत आपली उत्पादने आणण्याच्या तयारीत आहे. ज्यामध्ये कुकीज, बिस्कीट, रेडी टू इट उत्पादने, नमकीन व ताज इंडिया मसाला यांचा देखील समावेश आहे.