पुणे -कसबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आल्याने काँग्रेसच्या माजी नगरसेविका आणि शहराच्या पहिल्या महिला महापौर कमल व्यवहारे यांनी पक्षाला रामराम करत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी हजारो कार्यकर्ते मध्ये जोश असल्याचे दिसत यावेळी बोलताना व्यवहारे म्हणाल्या की गेल्या 40 वर्षापासून मी कार्यरत असून पक्षाच्या चुकीच्या पद्धतीने उमेदवारी दिली जात आहे .
निष्ठावंताना डावले जात आहे. माझ्या कार्याची दखल घेत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून मला उमेदवारी दिली. माझे काम हे सर्व पुणेकर सरांना सर्वश्रुत असून नक्कीच मी जनतेच्या समाजकार्यासाठी पुढाकार घेईन इ.स. १९९४ मध्ये अ्ड. वंदना चव्हाण यांना पक्षाने उमेदवारी दिली. त्यानंतर गेली ३० वर्षे पक्षाकडून पुण्यात एकाही महिला उमेदवाराला उमेदवारीची संधी देण्यात आली नाही.त्यामुळे आपण कसब्यातून उमेदवारी मागितली होती मात्र जी पक्षाला आपला मनुष्य आणि परका कोण हेच समजत नसल्याची खंत यावेळी बोलताना सांगितले. मला खात्री आहे शंभर टक्के जनता माझ्या पाठीशी राहील असा मला विश्वास आहे. मी आजपर्यंत जनतेच्या हिताचे निर्णय आजपर्यंत घेत आले आणि पुढे ही घेणार असल्याचे मत कसबा विधानसभा मतदारसंघाचे स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार कमल व्यवहारे यांनी यावेळी सांगितले.
कसबा पेठ विधानसभा कार्यक्षेत्रात गेली 25 वर्ष नगरसेवक म्हणून कार्य केल्याने मतदारसंघात कार्यकर्त्यांनी केलेल्या आग्रहामुळे अर्ज भरला जात असल्याचे यावेळी सांगितले.