पिंपरी,- पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी कासारवाडी भागात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचारफेरीस नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. मतदार संघातील लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभाग निहाय जनसंपर्क कार्यालय उभारण्याची घोषणा यावेळी आमदार अण्णा बनसोडे यांनी केली.
कासारवाडी येथील सूर्यमुखी महादेव मंदिराचे दर्शन घेऊन प्रचार फेरी सुरुवात करण्यात आली. या प्रचार फेरीत माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी नगरसेवक श्याम लांडे, माऊली थोरात, स्वाती उर्फ माई काटे, किरण मोटे, उल्हास शेट्टी, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वर्षा जगताप, आरपीआयचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भागवत, कष्टकरी कामगार नेते बाबा कांबळे, संजय अवसरमल, ॲड. आतिष लांडगे, ॲड. संजय दातीर पाटील, कुणाल लांडगे, बाळासाहेब लांडे, प्रकाश तात्या जवळकर, रघुनाथ जवळकर, प्रतिभा जवळकर, रवींद्र ओव्हाळ, शेखर कुटे, शेखर काटे, सीमा बोरसे, अमोल मोटे, सतीश लांडगे, बाळासाहेब रोकडे, तुकाराम बजबळकर, कुमार कांबळे, सुप्रिया काटे, सुनिता अडसुळे, महेश झपके आदींसह कासारवाडी परिसरातील महायुती घटक पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते.सूर्यमुखी महादेव मंदिराचे दर्शन घेऊन कासारवाडी येथे प्रचारफेरी सुरुवात झाली तेथून शास्त्रीनगर जवळकर कॉलनी, गुलिस्तान नगर, हिराबाई झोपडपट्टी, जय महाराष्ट्र चौक, ज्ञानेश्वर कॉलनी, पिंपळे सदन, नाशिक फाटा मार्गाने जाऊन गोयल रेसिडेन्सी येथे प्रचार फेरीचा समारोप करण्यात आला. या प्रचारफेरीस नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी महिला भगिनींनी औक्षण करून अण्णा बनसोडे यांना शुभेच्छा दिल्या. या भेटीत बनसोडे यांनी ज्येष्ठ नागरिक, नव मतदार, यांच्याशी संपर्क साधला. तरुण वर्गाचा मोठा पाठिंबा अण्णा बनसोडे यांना असल्याचे या रॅलीत दिसून आले.
लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभाग निहाय जनसंपर्क कार्यालय उभारणार – आ. अण्णा बनसोडे
प्रचार फेरीला कासारवाडीत उदंड प्रतिसाद
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
29.7
°
C
29.7
°
29.7
°
32 %
2.6kmh
0 %
Fri
31
°
Sat
31
°
Sun
33
°
Mon
33
°
Tue
33
°