29.7 C
New Delhi
Friday, October 10, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानशेअर मार्केटतर्फे ट्रेडिंग अनुभव सुलभ करण्यासाठी 'शीट्स' टूल सादर

शेअर मार्केटतर्फे ट्रेडिंग अनुभव सुलभ करण्यासाठी ‘शीट्स’ टूल सादर

पुणे : शेअर.मार्केट हे फोनपेचे एक उत्पादन असून त्यांनी आज ‘शीट्स’ हे टूल बाजारात आणत असल्याची घोषणा केली आहे. शेअर बाजारातील लोकांना अधिकाधिक सक्षम करण्यासाठी आणि त्यांचा ट्रेडिंग अनुभव सुलभ करण्यासाठी या उत्पादनाची रचना करण्यात आली आहे. ट्रेड शेअर डॉट मार्केट या वेब प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेले ‘शीट्स’ टूल ट्रेडर्सना बाजारातील माहिती थेट स्प्रेडशीटमध्ये घेण्यास आणि त्यांचे स्वतःचे ट्रेडिंग मॉडेल्स व धोरणे सहज तयार करण्यास मदत करते.शेअर.मार्केटने उद्योगात नवीन मापदंड प्रस्थापित करत शीट्सच्या अनोख्या लॉन्चच्या माध्यमातून एक क्रांतिकारक पाऊल उचलले आहे. हे अत्याधुनिक टूल असून अशा प्रकारचे नावीन्यपूर्ण फीचर्स देणारे शेअर मार्केटमधील देशातील ते एकमेव डिस्काउंट ब्रोकर झाले आहेत. या टूलमुळे शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्या लोकांना बाजारातील माहिती घेण्यासाठी आता स्वत:च्या बुद्धीचा वापर करण्याची गरज भासणार नाही.

विशिष्ट धोरणे आणि निकषांशी जुळवून घेण्यासाठी ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार रोख्यांचे मॅन्युअली विश्लेषण करतात. ही प्रक्रिया अतिशय वेळखाऊ असते आणि त्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात. हे आव्हान सोपे करण्याचे काम शीट्स करते. ट्रेडर्सना आणि ट्रेडर्स समुदायाला ऑप्शन स्ट्रॅटेजी तयार करण्यासाठी, खरेदी-विक्री संकेत तयार करण्यासाठी, आणि ट्रेंड्स प्रभावीपणे रिअल-टाइममध्ये विश्लेषण करण्यासाठी या टूलचा उपयोग होईल.

‘शीट्स’ स्टॉक्सची वॉचलिस्ट तयार करणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे सोपे करते. ट्रेडर्स त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार हवी तशी वॉचलिस्ट तयार करू शकतात. या फीचरच्या माध्यमातून, आधीच्या वॉचलिस्ट्स मिळवता येतात. या टूलमुळे रिअल-टाइम किंमत आणि टक्केवारीतील बदलांसह वॉचलिस्ट आपोआप अपडेट होईल. यामुळे ट्रेडर्सना त्यांच्या आवडत्या स्टॉक्सवर लक्ष ठेवणे सुलभ होते आणि मॅन्युल ट्रॅकिंगच्या त्रासापासून मुक्तता मिळेल.

शीट्सच्या लाँचबद्दल बोलताना, शेअर.मार्केटचे मुख्य कार्यकारी अधिकारी उज्ज्वल जैन म्हणाले, “शेअर मार्केट सतत बाजारात व्यवहार करणाऱ्या लोकांना उत्कृष्ट ब्रोकिंग अनुभव देण्यासाठी आणि त्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. मानवी हस्तक्षेपाशिवाय अनेक स्टॉक्सवर नजर ठेवण्याची प्रक्रिया स्वयंचलित करणारे शीट्स हे एकमेव टूल आहे. यामुळे ट्रेडर्सना गुंतवणुकीसाठी योग्य धोरणे तयार करता येतील आणि त्रुटींचा धोका कमी होईल. या टूल्सच्या मदतीने बाजारातील सिग्नल्स, ट्रेंड्स आणि गतींमध्ये बदल अचूकपणे ओळखता येतील.

आगामी तिमाहीत, शीट्स आपली क्षमता वाढवण्यासाठी आणखी काही फीचर्स सादर करणार आहे. त्याचा लाभ नवोदित आणि अनुभवी ट्रेडर्स दोघांनाही होईल.यामध्ये कस्टम स्ट्रॅटेजी बिल्डर या फीचरचा समावेश असून त्यामुळे ट्रेडर्सला नफा-तोट्याचा अंदाज लावण्यात मदत होईल.त्याचप्रमाणे ब्रेकईव्हन पॉइंट्स निश्चित करू शकतील आणि लाईव्ह चार्ट पाहू शकतील. गेल्या एक वर्षांत शेअर.मार्केटने उत्तम प्रगती केली असून २५ लाख आजीवन सदस्य आणि २० लाख म्युच्युल फंड एसआयपी व्यवहारांचा पाया तयार केला आहे. ऑगस्ट २०२४ पर्यंत त्यांनी २ लाख गुंतवणूकदारांचा टप्पा पार केला. त्याचबरोबर सर्वांत मोठ्या ब्रोकिंग प्लॅटफॉर्मच्या क्रमवारीत ते २१ व्या स्थानावर पोहोचले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
29.7 ° C
29.7 °
29.7 °
32 %
2.6kmh
0 %
Fri
31 °
Sat
31 °
Sun
33 °
Mon
33 °
Tue
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!