पुणे : महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि जुनी परंपरा म्हणजे रुखवत, जी विशेषतः लग्नाच्या पारंपरिक रीतिरिवाज यांसोबत जोडली गेली आहे. आजकाल या परंपरेला चित्रपट, नाटक आणि कथेच्या माध्यमातून नव्याने प्रगल्भ आणि प्रदर्शित केले जात आहे. महाराष्ट्रातील परंपरा आणि सांस्कृतिकचे महत्त्व रुखवत या चित्रपटाद्वारे लोकांसमोर मांडले असून हा चित्रपट येत्या 13 डिसेंबर 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
‘रुखवत’च्या मोशन पोस्टर मध्ये वधू-वराच्या वेशात सुंदर नटलेली बाहुला -बाहुली, मंगळसूत्र आणि हळदी-कुंकू लग्नसरायच्या धावपळीत लोकांचं लक्ष वेधून घेतेय. पोस्टर मध्ये खास आकर्षण असलेल्या संतोष जुवेकर आणि प्रियदर्शिनी इंदलकरच्या जळत्या फोटोमुळे या चित्रपटाच्या कथेची गोडी आणि गांभीर्यता स्पष्टपणे दिसून येत आहे. रुखवत मध्ये दोन प्रेमवेड्यांची कहाणी अनोख्या पद्धतीने मांडली आहे.जी लाकांना नक्कीच पसंतीस उतरेल.संतोष जुवेकर, प्रियदर्शिनी इंदलकर,अशोक समर्थ,अभिजीत चव्हाण आणि राजेंद्र शिसातकर हे ‘रुखवत’ या चित्रपटात खास भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम प्रधान यांनी केले आहे. विक्रम प्रधान हे एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत, ज्यांनी आपल्या कथा आणि चित्रणाद्वारे दर्शकांना वेगवेगळ्या अनोख्या अनुभवांची वासना दिली आहे. रुखवत मध्ये त्यांनी सांस्कृतिक धारा आणि थ्रिलर कथानक यांचे सुंदर मिश्रण साकारले आहे. रुखवत हा चित्रपट अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत, रब्री प्रोडक्शन निर्मित आणि निर्माती ब्रिंदा अग्रवाल द्वारे केला आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव रुखवत 13 डिसेंबर रोजी प्रदर्शित
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
29.7
°
C
29.7
°
29.7
°
32 %
2.6kmh
0 %
Fri
31
°
Sat
31
°
Sun
33
°
Mon
33
°
Tue
33
°