23.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeताज्या बातम्यातेजज्ञान फाउंडेशनची चळवळ ही समाजहिताची - अभिनेता सोनू सूद

तेजज्ञान फाउंडेशनची चळवळ ही समाजहिताची – अभिनेता सोनू सूद

ध्यानामुळे शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या व्यक्ती सशक्त होते – अभिनेता सोनू सूद

पुणे प्रतिनिधी  – गेल्या २५ वर्षांपासून समाजात अविरतपणे लोकहिताचे काम करणाऱ्या आणि जनसामान्यांच्या मनात सकारात्मक विचार  (हॅपी थॉट्स) रुजवणाऱ्या तेजज्ञान फाउंडेशन रौप्य महोत्सव सिंहगड रोड येथील मनन आश्रम येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या रौप्य महोत्सवी वर्षाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेता व चित्रपट निर्माता सोनू सूद यांच्या हस्ते पार पडले. मनन आश्रम येथील परिसरात सोनू सूद यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. त्याच बरोबर सुद यांनी सर्व साधकांबरोबर ध्यानह हि केले. त्याच बरोबर आश्रमाच्या विविध ठिकाणी सुद यांनी भेटी दिल्या.

कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी तेजज्ञान फाउंडेशनच्या कार्यकारी विश्वस्त तेजविद्या, प्रेरक वक्ता आणि लेखक भूपेंद्रसिंग राठोड असे अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. तेजज्ञान फाउंडेशनची स्थापना तेजगुरू सरश्री यांनी केली असून त्यांनी आपले जीवन संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी समर्पित केले आहे. या महोत्सवात त्यांचे हजारो शिष्य आश्रमात आणि ऑनलाईन सहभागी झाले होते.

सोनू सूद म्हणाले की ध्यानामुळे शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या व्यक्ती सशक्त होते आपण ध्यानाच्या माध्यमातून आपल्या मनाला तयार केल्यास आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. त्यासाठी ध्यान निश्चितच महत्वाचे आहे. तेजज्ञान फाउंडेशनची चळवळ ही समाजहिताची आहे. यात प्रत्येकाने सहभागी व्हायला हवे. स्वतःची मूठ आपण उघडून बघीतली पाहिजे काय माहीत आपल्या हातावरील रेषेमध्ये कोणाचा तरी जीव वाचवण्याची रेष लिहिली असेल. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेळ अशी येते त्यावेळी ठरवावे लागते पुस्तकाचे पान पलटी करायचे की पुस्तक बंद करायचे. पण आपण सर्वांनी जीवनाच्या पुस्तकाचे पान पलटी केल्यास इतिहास घडतो.

तेजज्ञान फाउंडेशनच्या विश्वस्त तेजविद्या जागतिक शांततेसाठीच्या कटिबद्धतेचा उल्लेख करत, म्हणाल्या की बाहेरच्या जगतात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रथम अंतर्मनात शांतता निर्माण करणे आवश्यक आहे. त्यांनी तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक सरश्री यांचा परिचय आणि त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा गौरव केला. ध्यानाचे महत्व पटवून देताना त्या म्हणाल्या ध्यान हे सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे. म्हणून प्रत्येकाने रोज ध्यान करणे गरजेचे आहे.

राठोड म्हणाले की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी सकारात्मक विचार ( हॅपी थॉट्स ) करणे फार महत्त्वाचे आहे. त्याच बरोबर ध्यान करण्याने प्रत्येकाच्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडतात. माझे आयुष्य फक्त आणि फक्त सकारात्मक विचार आणि ध्यानामुळे घडले. प्रत्येकाच्या जीवनात गुरू असणे गरजेचे आहे. गुरुमुळे जीवनाला अर्थ आहे. गुरूविना जीवन व्यर्थ आहे.

चौकट –

जीवनात स्वतःच्या अस्तित्वाला मान्य करा – सरश्री

सदरील कार्यक्रमात सरश्री यांनी ध्यानावर मार्गदर्शन केले. सरश्रींनी यात ध्यान का आणि कसे करावे, तसेच ध्यानाचे वरवरचे अंतिम लाभ म्हणजे ‘मी कोण आहे?’ या प्रश्नाचे उत्तर शोधणे, यावर प्रकाश टाकला. “मी कोण आहे?” हा शोध घेणे मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी सर्व उपस्थितांना २१ मिनिटांचे ध्यान अनुभवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले, यातून उपस्थितांना ‘स्व-अनुभव’ मिळाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
23.1 ° C
23.1 °
23.1 °
38 %
1.5kmh
0 %
Thu
24 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °
Mon
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!