पुणे : मिंत्रा या भारतातील या भारतातील आघाडीच्या फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईल डेस्टिनेशन्स पैकी एक असलेल्या मंचा तर्फे त्यांच्या एन्ड ऑफ रिझन सेल (इओआरएस) ची दिनांक १७ पासून सुरुवात होत असल्याची घोषणा केली. देशभरांतील फॅशन आणि ब्युटी च्या चाहत्यांसाठी आता दशकातील अजोड अशी हलचल या उपक्रमातून निर्माण होणार आहे. टिअर १ आणि टिअर २ शहरांसह विविध शहरातील कोट्यावधी ग्राहकांना आता आघाडीचे आंतरराष्ट्रीय, स्थानिक आणि स्थानीय स्तरावरील ब्रॅन्ड्ससह ३.५ दशलक्ष स्टाईल्स सह ९५ हून अधिक ब्रॅन्ड्स उपलब्ध असतील यामुळे फॅशनच्या भविष्यातील गरजा सुध्दा पूर्ण होतील.
इओआरएस मध्ये ग्राहकांचे आकर्षण असलेल्या विभागांमध्ये पुरुषांचे कॅज्युअल वेअर, पुरुष आणि महिलांचे एथनिक वेअर, महिलांचे वेस्टर्न वेअर, ब्युटी आणि पर्सनल केअर, घड्याळे आणि वेअरेबल्स, विंटर वेअर, ॲक्सेसरीज, ट्रॅव्हल इसेन्शियल्स, स्पोर्ट्स फूटवेअर, किड्स वेअर आणि वेडिंग कलेक्शन यांचा समावेश आहे. या विविध विभागांमध्ये विविध प्रकारच्या अनेक ब्रॅन्ड्सचा समावेश असून यांत लिव्हाईस, नाईके, आदिदास, एचॲन्डएम, लोरियाल, डेकॅथलॉन, न्यू बॅलन्स, राँग आणि रेअर रॅबिट तसेच अन्य ब्रॅन्ड्सचा समावेश आहे . अगदी कोझी लेअर्स पासून ग्लॅमरस एन्सेबल्स, नवीन कलेक्शन्स मुळे प्रत्येक कार्यक्रम, मौसम आणि स्टाईल नुसार योग्य उत्पादने आहेत.
हाच उत्साह पुढे सुरु ठेवत मिंत्रा तर्फे जेन झी साठी विशेष १लाख ट्रेन्ड फर्स्ट स्टाईल्स उपलब्ध असून यांत हर्शेनबॉक्स, ग्लिचेझ, केपॉप, स्लिक, लूलू ॲन्ड स्काय, बाँकर्स कॉर्नर, कॉशुली, फ्रिकीन्स, प्राँक, बेवकुफ, हाऊस ऑफ कोआला इत्यादींसह अनेक गोष्टींचा समावेश आहे.इओआरएसच्या २१ व्या पर्वात खरेदी आनंददायी करण्यासाठी अनेक नवीन सुरुवाती होणार आहेत. यामध्ये न्युयॉर्क येथील प्रसिध्द स्ट्रीटवेअर ब्रॅन्ड एक्स्ट्रा बटर, जपानी स्पोर्ट्स ब्रॅन्ड योनेक्स आणि मध्यपूर्वेतील किड्सवेअर ब्रॅन्ड बेबीशॉपचा समावेश आहे. अन्य नवीन केलक्शनच्या सुरुवाती मध्ये अमेरिकन इगल आऊटफिटर्स एक्स जान्हवी कपूर, क्रॉक्स एक्स स्क्वीड गेम, टायटन स्टेलर्सची लिमिटेड एडिशन दि युनिटी वॉच, कॅसिओ जी स्टील कलेक्शन, नॉईस एअर क्लिप इअरबड्स, सॅमसोनाईट रेड, गिगा डिझाईन, अन्टासिया ब्रेव्हर्ली हिल्स आणि पुरुषांच्या ओकेजनल वेअर कलेक्शन मधील जयपोर ब्रॅन्डचा समावेश आहे.
ब्यूटी आणि पर्सनल केअर ब्रॅन्ड्स मध्ये मॅक्स फॅक्टर एक्स प्रियांका चोप्रा जोन्स कलेक्शन, क्लॅरन्स हायड्रा इसेन्शियल ट्रॅव्हल कलेक्शन आणि हुडा ब्युटीज इझी ब्लर फाऊन्डेशनचा समावेश आहे. त्याच बरोबर आता ग्राहकांना स्निकर ड्रॉप्स चे नवीन ब्रॅन्ड्स ही खरेदी करु शकतील यामध्ये नायके, आदिदास ओरिजिनल्स आणि न्यू बॅलन्स यांचा समावेश आहे.
ईओआरएसच्या २१ व्या पर्वा विषयी बोलतांना मिंत्राचे रेव्हेन्यू आणि ग्रोथ चे प्रमुख भरत कुमार बी एस नी सांगितले “ इओआरएस चे दशक साजरे करतांना आमच्या ग्राहकांसाठी अजोड खरेदीचा अनुभव सादर करतांना आम्ही उत्साही आहोत. आम्ही नवीन आंतरराष्ट्रीय स्तरावरील ब्रॅन्ड्सची सुरुवात फॅशन फॉरवर्ड ग्राहकांसाठी आणली आहे, ज्यामुळे देशभरातील कोट्यावधी ग्राहकांना आंतरराष्ट्रीय ब्रॅन्ड्स उपलब्ध करुन देण्याची आमची वचनबध्दता अधोरेखित होते. त्याच बरोबर लग्ने, सुट्ट्या आणि पार्टी सिझन साठी इओआरएस मुळे ग्राहकांना ट्रेन्ड फर्स्ट स्टाईल्स दर्शवून त्यांची वैयक्तिक आवड जपून फॅशन ब्युटी आणि ॲक्सेसरीज खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.”
आता या महोत्सवामुळे ब्रॅन्ड्सना त्यांच्या कोट्यावधी ग्राहकांपर्यत पोहोचण्यासह अनोखी अशी संधी मिळून पहिल्यांदाच खरेदी करणार्या ग्राहकांना उत्सुकतने ओनख्या आणि ट्रेन्डी फॅशन आणि ब्युटी उपाय उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. शॉपिंगच्या या कार्यक्रमात अनेक आकर्षक डील्स, जसे ब्रॅन्ड मेनियाज, मिडनाईट स्टील रन्स आणि ग्रॅब ऑर गॉन डील्सही असणार आहेत.