देव जेव्हा आपल्या खात्यात अतिरिक्त पैसे देतो तेव्हा ते व्याज म्हणून समाजाला परत दिले पाहिजे असे प्रतिपादन राज्यमंत्री ना. माधुरी मिसाळ यांनी केले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि वेस्टर्न इंडिया फोर्जिंग तर्फे नवरत्न वृद्धाश्रम आणि स्वामीआंगण वृद्धाश्रम या स्वयंसेवी संस्थांना तीन महिने पुरेल इतके धान्य तर शांतिबन वृद्धाश्रमाला गिझर भेट देण्यात आले त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त व माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,विश्वस्त देवेंद्र भाटिया,सतीश कोंडाळकर, विनायक काटकर, प्रतीक खर्डेकर,राजेंद्र गादिया व इतर मान्यवर उपस्थित होते.
संदीप खर्डेकर यांचे क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या माध्यमातून सुरु असलेले समाजकार्य मी अनेक वर्ष बघत आली आहे, अनेक कार्यक्रमात ही माझी उपस्थिती राहिली आहे,त्यांचे कार्य समजोपयोगी असल्याचे ही ना. माधुरी मिसाळ म्हणाल्या. देवाने आपल्याला जे जास्तीचे धन दिले आहे ते समाजाला परत केले तर तो आपल्याला अजून देत राहतो पण जर आपण त्याचा सदुपयोग केला नाही तर आपल्याला येणाऱ्या निधीचा ओघ थांबतो असे सांगतानाच कार्यकर्त्यांनी समाजकार्य करत रहावे असेही नामदार माधुरी मिसाळ म्हणाल्या.क्रिएटिव्ह फाउंडेशन नेहमीच निस्पृहपणे समाजकार्य करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या शोधात असते आणि मग अश्या संस्थांना जे हवं ते उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असतो असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.
वारजे येथील शांतिबन वृद्धाश्रमाच्या संचालिका अनिता देवधर यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी गिझर व डायपर ची गरज असल्याचे सांगितल्यामुळे त्यांना त्या वस्तू देण्यात आले.
तर वडगाव धायरी येथील नवरत्न वृद्धाश्रम च्या संचालिका अनिता राकडे आणि डोणजे येथील स्वामी आंगण च्या संचालिका आनंदी जोशी यांनी धान्याची गरज असल्याचे सांगितले. ह्या संस्थांना 360 किलो गहू,180 किलो तांदूळ, 60 किलो साखर यासह तूरडाळ,तेल, रवा, पोहे, स्वच्छता साहित्य व अन्य किराणा माल देण्यात आला असे संदीप खर्डेकर म्हणाले. तसेच कार्यक्रमात सत्कार रूपाने मिळालेल्या 60 शाल देखील ज्येष्ठ नागरिकांसाठी देण्यात आल्याचे ही खर्डेकर म्हणाले. पुण्यात वेस्टर्न इंडिया फोर्जिंग, ग्लोबल ग्रूप यासारख्या अनेक श्रीमंत कंपन्या गरजुंना मदत करण्यासाठी तत्पर असतात, अश्या दानशूर व्यक्ती आणि गरजू संस्था यांच्यातील पूल म्हणून क्रिएटिव्ह फाउंडेशन काम करते असेही संदीप खर्डेकर यांनी नमूद केले.नवीन वर्षात अधिकाधिक गरजू संस्थांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना यथायोग्य मदत करण्याचा आमचा संकल्प असून अश्या संस्थांनी 9850999995 ह्या क्रमांकावर संपर्क साधावा असे क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. तसेच आम्ही रोख मदत करत नसून उपयुक्त वस्तुरूपीच मदत करतो असेही सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.सौ. कल्याणी खर्डेकर यांनी स्वागत व आभार प्रदर्शन केले.
देव आपल्या खात्यात जे अतिरिक्त देतो ते समाजाला परत द्यावे – ना. माधुरी मिसाळ
क्रिएटिव्ह फाउंडेशन व वेस्टर्न इंडिया फोर्जिंग तर्फे विविध संस्थांना उपयोगी वस्तू भेट - संदीप खर्डेकर
RELATED ARTICLES
New Delhi
overcast clouds
28.7
°
C
28.7
°
28.7
°
78 %
4.6kmh
97 %
Mon
29
°
Tue
34
°
Wed
36
°
Thu
35
°
Fri
30
°