सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” sangeet manapmaan चित्रपटाच शंकर महादेवन आणि बेला शेंडे bela shendhe यांच्या सूमधुर आवजातल गाणं ‘ऋतु वसंत’ झाल प्रदर्शित !!
वसंत ऋतुच्या सौंदर्याने आणि मोहकतेने संगीत मानापमान चित्रपटालाही भूरळ घातली आहे. या चित्रपटात वसंत ऋतूच्या उत्सवाला साजर करणारं एक गाणं नुकतंच रिलीज झाल आहे. सुबोध भावे, वैदेही परशुरामी बरोबरच खुद्द शंकर महादेवन आणि बेला शेंडे ही या बहारदार गाण्यावर थिरकताना दिसतायत. ५००हून अधिक डान्सर्स, पारंपरिक वेशभुषा, कमालीचं नृत्य, गाण्यातील साधेपणा थेट मनाला भिडणारे बोल असं सुंदर मिश्रण, एवढंच नव्हें तर शंकरजी आणि बेला यांचे सुमधुर स्वर चार चाँद लावत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडतायत. गाण्यात सुबोध भावे आणि वैदेही परशुरामी ह्या दोघां कलाकारांची हलकी फुलकी, गोड, सोज्वळ केमिस्ट्री सुद्धा कमालीची दिसतेय.
या गाण्याचे बोल समीर सामंत ह्यांनी अतिशय सुंदर लिहिले आहेत. शंकर एहसान लॉय यांचं संगीतही तितक्याच ताकदीचे आहे. त्यामुळे हे गाणं नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरून तरुण पिढीलाही थिरकायला लावेल एवढं नक्किच. एखादा लढा जिंकून आल्यावर जो भाव एका मावळ्याच्या मनात असतो तशीच काहीशी भावना, तोच जश्न ह्या सुरेख सिम्पल गाण्यात आपण बघू शकतो.
आगामी मराठी संगीतमय चित्रपट ‘संगीत मानापमान’ साठी दिग्गज संगीतकार शंकर-एहसान-लॉय ह्यांनी मंत्रमुग्ध करणारी एकूण १४ गाणी कंपोज केली आहेत. तर ह्या गाण्यांना १८ नामवंत गायकांनी गायलं आहे.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत jio studio, ज्योती देशपांडे आणि श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” ची म्युझिक कंपनी सारेगामा आहे.
चित्रपटात सूबोध भावे, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाचे पटकथा आणि कथाविस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहे तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा प्राजक्त देशमुख यांनी केले आहे. अशाप्रकारे ‘ऋतु वसंत’ हे गाणं साऱ्यांच्या खास करुन प्रेमी युगलांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज झालं आहे. येत्या नवीन वर्षी म्हणजेच १० जानेवारी २०२५ ला संगीताने नटलेला हा चित्रपट थिएटरमध्ये अनुभवायला सज्ज व्हा.