पुणे, : केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम १९८ अन्वये नवीन दुचाकी वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना खरेदीच्यावेळी वाहन वितरकाने दोन हेल्मेट पुरविण्याबाबत दुचाकी वाहन वितरकांना सुचना देण्यात आल्या आहेत; ग्राहकांनी नवीन दुचाकी वाहन खरेदी करतांना वितरकांकडून हेल्मेट घ्यावेत, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.दुचाकीस्वारांनी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर केल्यास अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे वाहनचालक आणि सोबत बसलेल्या व्यक्तीनेही रस्ता सुरक्षा मानकांची पूर्तता करणाऱ्या हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक आहे, अशी माहिती श्री. भोसले यांनी दिली आहे.
वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना हेल्मेट पुरविण्याच्या वितरकांना सूचना
RELATED ARTICLES
New Delhi
overcast clouds
27.3
°
C
27.3
°
27.3
°
88 %
3.7kmh
100 %
Mon
27
°
Tue
35
°
Wed
35
°
Thu
36
°
Fri
34
°