पुणे- भारतीय लष्कर हे काेणत्याही प्रकारचा हल्ला परतविण्यास सक्षम असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. १५ जानेवारी रोजीचा लष्कर दिन यंदा पहिल्यांदाच पुण्यात साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने लष्करातर्फे रेसकोर्स मैदानावर ‘नाे युवर अार्मी’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. फडणवीस पुढे म्हणाले की, भारतीय लष्कराची क्षमता दर्शवण्यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.
उद्घाटन कार्यक्रमाल लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, खासदार मेधा कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते. ते म्हणाले, ‘‘ या प्रदर्शनाच्या निमित्ताने
लष्कराने केलेले नवीन संशाेधन, संरक्षण क्षेत्रातील स्टार्ट अप पाहण्याची संधी अापल्याला या प्रदर्शनातून मिळते. या प्रदर्शनाचा मुळ हेतू हा जनेतेला लष्कराची अाेळख करून देणे, जवळ अाणणे अाहे. तसेच अापल्या देशातील युवकानांना लष्करासाेबत काम करणे अािण सैन्यात भरती हाेण्यासाठी प्राेत्साहन देणे हाच अाहे.’’
देशातील अंतर्गत अाणि बाह्य सुरक्षा व्यवस्था मजबुत असल्याचे नमूद करीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘ भारताचे सैन्य दल हे जगातील उत्तम सैन्य दलांपैकी एक अाहे. अाकाश, जमीन अशा सर्व प्रकारच्या हल्ल्याला परतवू शकते असे अापले सैन्यदल अाहे.’’
उद्घाटन कार्यक्रमात कुकरी नृत्य, लेझिम नृत्य, कलारी पयातू, अश्वरोहन प्रात्यक्षिक, शीख युद्धकला याच प्रात्यक्षिक झालं, स्वार्न ड्रोनही ची प्रात्यक्षिक दाखवण्यात आली हे द्रोण २४ तास आकाशात उडू शकतात.
या प्रदर्शनात लष्करात वापरल जाणार अत्याधुनिक तंत्रज्ञान, अद्ययावत उपकरण, भारतीय लष्कराचे रणगाडे, चिलखती वाहनं, आकाश क्षेपणास्त्र, द्रोण, संपूर्ण भारतीय बनावटीची उपकरणं, पिनका रॉकेट यंत्रणा, धनुष आणि बोफोर्स तोफा, रशियन बनावटीच टी ९० रणगाडा आदी उपकरण सर्व सामान्य नागरिकांना पाहता येणार आहेत.
३ ते ५ जानेवारी दरम्यान हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत पाहता येईल. सरकारी ओळखपत्र आवश्यक आहे.
भारतीय लष्कर हे काेणत्याही प्रकारचा हल्ला परतविण्यास सक्षम- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
RELATED ARTICLES
New Delhi
haze
14.1
°
C
14.1
°
14.1
°
72 %
0kmh
0 %
Wed
20
°
Thu
25
°
Fri
26
°
Sat
26
°
Sun
25
°


