पिंपरी- Bonde Vanijya Ltd तर्फे एक दिवसीय औद्योगिक प्रदर्शन (Indistrial Exhibition) निगडी प्राधिकरण येथील पाटीदार भवन (गणेश तलाव जवळ) येथे दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11.0 ते संध्याकाळी 7.0 या वेळेतच आयोजित करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून श्री प्रमोद वाकोडकर, प्रदेशाध्यक्ष भाजपा उद्योग आघाडी तसेच विविध औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री संतोष कुलकर्णी Taural India Pvt Ltd, श्री प्रसाद कुलकर्णी SAP Parts Pvt Ltd आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून छ संभाजीनगर येथील Rudarnee Infrastructure चे सर्वेसर्वा मा विवेकजी देशपांडे उपस्थित असणार आहेत.प्रदर्शनात ऑटोमेशन, इंजिनिअरिंग इंडस्ट्री सर्व्हिसेस, स्टोरेज सिस्टिम, इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग, सिस्टिम्स मॅनेजमेंट, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल सरफेस कोटिंग व पेंट्स, सी एन सी, व्ही एम सी, एच एम सी, मशीनिंग, सॉफ्टवेअर सोल्युशन्स, अकाउंटिंग अँड फायनान्स, सोलर सिस्टिम, व्हर्टिकल ट्रान्सपोर्टेशन, इंडस्ट्रियल लुब्रिकंट्स इत्यादी विविध प्रकारचे स्टॉल असणार आहेत. पुणे परिसरातील 60 किलोमीटर भागातील औद्योगिक क्षेत्रातील लोकांना या प्रदर्शनाचा भरपूर लाभ होईल. या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.प्रदर्शनास कोईमतूर येथील Evoke Engineering Pvt Ltd. डायरेक्टर श्री एम थिरुमल यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
असे Bond India तर्फे याचे आयोजन केले आहे.
निगडी प्राधिकरण येथे औद्योगिक प्रदर्शन
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
34.5
°
C
34.5
°
34.5
°
54 %
1.4kmh
10 %
Sun
34
°
Mon
35
°
Tue
37
°
Wed
32
°
Thu
27
°