पुणे : स्थानिक आणि स्वदेशी गोष्टी विकत घ्याव्यात अशी सुरूवात जेव्हा झाली आणि मॉल असा काही प्रकारही जेव्हा नव्हता, तेव्हा सगळ्या वस्तू योग्य दरात मिळण्यासाठी ग्राहक पेठ सुरू झाली. स्थानिक उत्पादकांना, उत्पादनांना, शेतकर्यांना आणि नव उद्योजकांना गेले अनेक वर्ष प्रोत्साहन ग्राहक पेठेच्या माध्यमातून दिले जात आहे, असे मत खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.सदाशिव पेठेतील खजिना विहीर चौकात ग्राहक पेठ तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्राहक पेठेच्या उपाध्यक्षा संध्या भिडे, कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, जयराज आणि कंपनीचे राजेश शहा, कोहिनूर कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर फिरोज शेख आदी या प्रसंगी उपस्थित होते.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, मागील ३३ वर्षांपासून ग्राहक पेठ तांदूळ महोत्सव सुरू आहे. यातच या तांदूळ महोत्सवाचे खर्या अर्थाने यश आहे. खरा बासमती कोणता? बासमतीमधील तिबार, दुबार, मोगरा म्हणजे काय? या सर्वांची माहिती तांदूळ महोत्सवाच्या माध्यमातून ग्राहकांना दिली जाते. वर्षाच्या साठवणीसाठी पुणेकरांना खात्रीशीर उत्तम दर्जाचा तांदूळ रास्त दरात देण्याची प्रथा तांदूळ महोत्सवात सुरू झाल्यामुळे पुणेकरांचा याला प्रतिवर्षी वाढता प्रतिसाद मिळत
सूर्यकांत पाठक म्हणाले, ‘वर्षाच्या साठवणीकरिता दर्जेदार तांदूळ मिळावा, या उद्देशाने ग्राहकपेठेने सुरू केलेल्या तांदूळ महोत्सवास या वर्षी ३३ वर्षे पूर्ण होत आहेत. या महोत्सवामध्ये भोर, वेल्हा, मावळ, मुळशी या भागातील थेट शेतकर्यांसह विविध राज्यातील बासमती पासून आंबेमोहोर पर्यंत आणि इंद्रायणीपासून कोलम, चिन्नोर पर्यंत सुमारे ४८ प्रकारे वाण उपलब्ध आहेत. हा तांदूळ महोत्सव ३० जानेवारीपर्यंत सुरू राहील, अशीही माहिती त्यांनी दिली.
![](https://tiptop24news.com/wp-content/uploads/2025/01/Grahak-Peth-Tandool-Mahotsav-5-1024x681.jpeg)