मुंबई- मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याची घोषणा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. आघाडीत कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळत नाही, त्याचा फटका पक्षाला बसतो. मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावयचे आहे. उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील संकेत दिले आहेत, असेही संजय राऊत म्हणाले. ठाकरे गटाच्या या घोषणेमुळे महाविकास आघाडीत फूट पडली आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ठाकरे गट महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली. ते म्हणाले की, ‘मुंबईपासून ते नागपूरपर्यंत सर्व महापालिकेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार आहोत.आम्हाला उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील संकेत दिलेले आहेत. आमचा असा निर्णय होत आहे की मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर असेल. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? कारण आघाडीत आणि विधानसभेत कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला आणि पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका corporatin, जिल्हा परिषदा dist parishad आणि नगरपंचायतीमध्ये निवडणुका election स्वबळावर लढून आपआपले पक्ष मजबूत करावे लागतात.