30.7 C
New Delhi
Sunday, July 6, 2025
Homeक्रीड़ासातवी विश्वनाथ स्पोर्ट मिट २४ जानेवारीपासून

सातवी विश्वनाथ स्पोर्ट मिट २४ जानेवारीपासून

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेंसह, अंजली भागवत, सचिन खिलारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन

पुणेः एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्‍नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे दरवर्षीप्रमाणे यंदाही ७व्या विश्वनाथ स्पोर्ट मिट (व्हीएसएम-२०२५) या आपल्या वर्षातील सर्वांत मोठ्या राज्यस्थरीय आंतरमहाविद्यालयीन/ आंतरविद्यापीठीय क्रीडा महोत्सवासाठी सज्ज झाले आहे. यंदा या स्पर्धेचा ७व्या हंगाम २४ ते २९ जानेवारी २०२५ दरम्यान विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात पार पडणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दि.२४ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार आहे. सदर कार्यक्रम माईर्स एमआयटी mit education शिक्षण समुहाचे संस्थापक विश्वधर्मी प्रा. डॉ.विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली तर राजीव गांधी खेलरत्न व अर्जुन पुरस्कार प्राप्त नेमबाज अंजली भागवत व अर्जुन पुरस्कार विजेते पॅरा अँथलिट सचिन खिलारे (रौप्य पदक विजेता, पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धा २०२४) विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ.मंगेश कराड, डॉ.सुनीता कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
स्पर्धेचा समारोप व बक्षिस वितरण समारंभ विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात बुधवार दि. २९ जानेवारी रोजी शिरुर-हवेली मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर कटके, ब्रिगेडिअर दिलीप पटवर्धन (निवृत्त) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यंदाच्या स्पर्धेत क्रिकेट (पुरुष), फुटबाॅल (महिला व पुरुष), बॅडमिंटन (महिला व पुरुष), बास्केटबाॅल (महिला व पुरुष), हाॅलीबाॅल (महिला व पुरुष), टेबल टेनिस (महिला व पुरुष), कबड्डी, टेनिस (महिला व पुरुष), खो-खो, वाॅटर पोलो (महिला व पुरुष), स्विमिंग (महिला व पुरुष), बाॅक्सिंग(महिला व पुरुष), रोईंग (महिला व पुरुष), नेमबाजी (महिला व पुरुष), बुद्धीबळ (महिला व पुरुष) इत्यादी खेळांमधून खेळाडूंना जवळपास १० लाखांची बक्षिसे मिळविण्याची संधी आहे.
प्रा. डॉ.विश्वनाथ कराड यांच्या प्रेरणेतून व प्रा. डॉ.मंगेश कराड dr mangesh karad यांच्या पुढाकाराने राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजावी व त्यातून विविध क्रीडाप्रकारांत प्रतिभाशाली खेळाडू तयार व्हावेत यासाठी विश्वनाथ स्पोर्ट मिट या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या क्रीडा व्यासपीठाच्या माध्यमातून चांगले खेळाडू तयार करून राज्यासह देशाच्या क्रीडा संस्कृतीत भर घालण्याचा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
एमआयटी एडीटी विद्यापीठ, विश्वराजबाग पुणेच्या १५०+ एकरांच्या प्रशस्त व विविध क्रीडा सुविधांनी सुसज्ज अशा कँपसमध्ये ‘खेळाच्या माध्यमातून राष्ट्र उभारणी’ या ब्रिद वाक्यासह होणाऱ्या व्हीएसएम-७ मध्ये आत्तापर्यंत १३५ हून अधिक शैक्षणिक संस्थांमधील तब्बल ५ हजारांहून अधिक खेळाडूंनी १५ हून अधिक क्रीडा प्रकारांसाठी आपली नावनोंदणी केलेली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पाच दिवस तब्बल १० हजारांहून अधिक खेळाडू व त्यांच्या प्रशिक्षकांचा राबता विद्यापीठाच्या आवारात राहणार आहे. तसेच अद्यापही या स्पर्धेसाठी नाव नोंदणी चालू असून राज्यातील खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेऊन विद्यापीठाच्या सुसज्ज क्रीडा सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू तथा स्पर्धा नियोजन समितीचे चेअरमन प्रा. डॉ.राजेश एस., कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा.पद्माकर फड, विद्यार्थी कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.सुराज भोयार यांनी केले आहे.


यंदाच्या विश्वनाथ स्पोर्ट-७ मिटमध्ये १५ हून अधिक क्रीडा प्रकारांमध्ये १३५हून शिक्षण संस्थांमधील ६ हजारांहून अधिक खेळाडू आपली प्रतिभा दाखविणार आहेत. विद्यापीठातील डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी क्रीडा अकादमीमधील विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी स्पर्धेच्या तयारीत आघाडी घेतली असून, त्यामुळे स्पर्धेच्या या चार दिवसांत विद्यापीठाचे वातावरण क्रीडा मय होणार आहे.

  • प्रा.डॉ. मंगेश कराड,
    कार्यकारी अध्यक्ष,
    एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
30.7 ° C
30.7 °
30.7 °
65 %
2.6kmh
37 %
Sun
34 °
Mon
35 °
Tue
37 °
Wed
32 °
Thu
27 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!