24.5 C
New Delhi
Friday, March 14, 2025
Homeदेश-विदेशभक्तिचा सुगंध सर्वत्र पसरवत ५८ व्या निरंकारी संत समागमाची यशस्वीरित्या सांगता

भक्तिचा सुगंध सर्वत्र पसरवत ५८ व्या निरंकारी संत समागमाची यशस्वीरित्या सांगता

जीवनाचा उद्देश केवळ भौतिक प्रगती नसूनं आत्मिक उन्नतीमध्ये निहित आहे

सामूहिक विवाह समारोहामध्यें 93 जोडपी विवाहबद्ध

निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात आयोजित सामूहिक विवाह समारोहामध्ये महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांतून व विदेशातून आलेल्या ९३ जोडप्यांचा विवाह संपन्न झाला. महाराष्ट्राच्या ५८व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची विधिवत सांगता झाल्यानंतर पिंपरीच्या मिलिटरी डेअरी फार्म ग्राउंडवरच या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

  • पिंपरी, : ‘‘जीवनाचा उद्देश केवळ भौतिक प्रगतीमध्ये नसून आत्मिक उन्नतीमध्ये निहित आहे.’असे उद्गार निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या ५८ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या समापन दिवशी लाखोंच्या संख्येने उपस्थित मानव परिवाराला संबोधित करताना व्यक्त केले. या तीन दिवसीय संत समागमाची विधिवतपणे यशस्वीरित्या सांगता झाली.
  • सतगुरु माताजी पुढे म्हणाल्या, मानवी जीवन एवढ्याचसाठी श्रेष्ठ मानले गेले आहे, की या जीवनात आत्मज्ञान प्राप्त करण्याची क्षमता आहे. परमात्मा निराकार असून या परमसत्याला जाणणे हेच मनुष्य जन्माचे परम लक्ष्य होय.
  • शेवटी, सतगुरु माताजींनी सांगितले, की जीवन एक वरदान असून ते परमात्म्याशी क्षणोक्षणी संलग्न राहून जगायला हवे. क्षणोक्षणी जीवन योग्य दिशेने व्यतीत केल्याने आपल्याला आत्मिक शांती मिळू शकते आणि आम्ही अनंताच्या दिशेने अग्रेसर होऊ शकतो.
  • तत्पूर्वी समागमाच्या दुसऱ्या दिवशी सतगुरु माताजींनी sadaguru mataji आपल्या प्रवचनामध्ये सांगितले, की जीवनामध्ये ज्ञान आणि कर्म या दोहोंचा संगम गरजेचा आहे ज्यायोगे जीवन सुखमय बनू शकेल. जसे पक्ष्याला आकाशात झेप घेण्यासाठी दोन्ही पंखांची गरज असते तसेच जीवनात उंच भरारी घेण्यासाठी ज्ञान प्राप्त करुन त्यानुसार कर्म करण्याची गरज असते. ब्रह्मज्ञानी भक्त जीवनात परमात्म्याशी नाते जोडून प्रत्येक कार्य त्याच्या अनुसंधानामध्ये राहून करत असतो. खरं तर हेच भक्तीचे वास्तविक स्वरूप होय.
  • समागमात आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांनी आपल्या विचारांमध्ये सांगितले, की भक्ती करण्याचा हेतु हा परमात्म्याशी प्रेम जोडण्याचा असावा. या संदर्भात संतांचे जीवन आम्हाला प्रेरणादायी ठरते. कारण संत आपल्या आत्म्याचे मूळ स्वरूप जाणून जीवनाला योग्य दिशेला घेऊन जाण्याची शिकवण देतात. आपण आपली आस्था आणि श्रद्धेला सत्याकडे वळविले पाहिजे तेव्हाच परमात्म्याच्या प्रति प्रेम उत्पन्न होईल आणि खऱ्या अर्थाने भक्तीचा विस्तार सार्थक ठरेल.

कवी दरबार
समागमाच्या तिसऱ्या दिवशी एका बहुभाषी कवी दरबारचे आयोजन करण्यात आले ज्याचे शीर्षक होते ‘विस्तार – असीम की ओर।’ महाराष्ट्रा व्यतिरिक्त देशाच्या विविध भागातून आलेल्या एकंदर २१ कवींनी मराठी, हिन्दी, इंग्रजी, कोंकणी, भोजपुरी आदि भाषांच्या माध्यमातून काव्य पाठ करत मिशनचा दिव्य संदेश प्रसारित केला. श्रोत्यांनी या कवी दरबाराचा भरपूर आनंद लुटण्याबरोबरच कवि सज्जनांचे कौतुक केले.
मुख्य कवी दरबारा व्यतिरिक्त समागमाच्या प्रथम दिनी बाल कवी दरबार तर दुसऱ्या दिवशी महिला कवी दरबाराचे आयोजन केले गेले. या दोन्ही लघु कवी दरबारांमध्ये मराठी, हिन्दी व इंग्रेजी भाषांच्या माध्यमातून बाल कवी आणि महिला कवियत्रिंनी काव्य पाठ केला ज्याची श्रोत्यांनी खूप प्रशंसा केली.

निरंकारी प्रदर्शनी
या समागमात ’विस्तार-असीम की ओर’ या मुख्य विषयावर आधारित निरंकारी प्रदर्शनी श्रोत्यांसाठी विशेष आर्कषणाचे केंद्र बनून राहिली. या प्रदर्शनीचे मुख्यतः दोन भागांमध्ये विभाजन करण्यात आले होते. प्रथम भागात मिशनचा इतिहास, विचारधारा आणि सामायिक उपक्रमांच्या व्यतिरिक्त सतगुरुंनी देश व विदेशांमध्ये केलेल्या मानव कल्याण यात्रांची सचित्र माहिती देण्यात आली होती तर दुसऱ्या भागात संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन मार्फत राबविल्या जाणाऱ्या सामाजिक कार्याची माहिती दर्शविण्यात आली होती. त्यामध्ये प्रामुख्याने संपूर्ण भारतात राबविला जात असलेला प्रोजेक्ट वननेस वन तसेच प्रोजेक्ट अमृत हे उल्लेखनीय होते. या शिवाय निरंकारी nirankari इंस्टिट्यूट ऑफ म्युझिक अॅन्ड आर्ट्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे दिसले.

कायरोप्रॅक्टिक शिविर
समागमामध्ये काईरोप्रॅक्टिक थेरपी द्वारे निःशुल्क उपचार करण्याचे शिबिर आयोजन करण्यात आले होते. ही थेरपी मुख्यत्वे पाठीच्या कण्याच्या विकारांशी निगडित आहे. या तंत्राने उपचार करणारी ऑस्ट्रेलिया, यूनायटेड किंगडम, फ्रांस, अमेरिका येथील १८ डॉक्टरांची टीम आपल्या निष्काम सेवा प्रदान करत होती. यावर्षी जवळपास ३५०० लोकांनी या थेरपीद्वारे उपचाराचा लाभ घेतला.

निःशुल्क डिस्पेन्सरी
समागम स्थळावर एक ६० बेडचे रुग्णालय तयार करण्यात आले होते ज्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत आयसीयूची सुविधाही उपलब्ध होती. या व्यतिरिक्त तीन ठिकाणी निःशुल्क होमियोपॅथी व डिस्पेन्सरींची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये वायसीएम रुग्णालय तसेच डी वाय पाटील रुग्णालय ने महत्वपूर्ण योगदान दिले. समागम स्थळावर ११ रुग्णवाहिका तैनात होत्या. स्वास्थ्य सेवेमध्ये २८२ डॉक्टरर्स तसेच जवळपास ४५० सेवादल स्वयंसेवक आपल्या सेवा देत होते.

लंगर
समागमामध्ये येणाऱ्या सर्व भाविकांसाठी निःशुल्क महाप्रसाद म्हणजेच लंगरची व्यवस्था तीन ठिकाणी करण्यात आली होती. या लंगर व्यवस्थेमध्ये ७२ क्विंटल तांदूळ एकाच वेळी सिजवला जाण्याची क्षमता होती तसेच ७० हजार भाविक एकाच वेळी भोजन करु शकतील अशी व्यवस्था होती. सतगुरु प्रवचना व्यतिरिक्त २४ तास लंगर उपलब्ध होते. या व्यतिरिक्त अत्यल्प दराने अल्पोपहार, मिनरल वॉटर व चहा-कॉफी इत्यादि उपलब्ध करुन देण्यासाठी ४ कॅन्टीन्सची व्यवस्था करण्यात आली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
24.5 ° C
24.5 °
24.5 °
32 %
1.5kmh
99 %
Fri
35 °
Sat
36 °
Sun
34 °
Mon
34 °
Tue
34 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!