32.8 C
New Delhi
Wednesday, July 2, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानआता हायड्रोजनवर चालणार ट्रक

आता हायड्रोजनवर चालणार ट्रक

मुंबई :  देशातील माल वाहतुकीला पर्यावरणस्नेही हायड्रोजन इंधनाची साथ लाभणार आहे. टाटा मोटर्सचा पॉईमा ट्रक संपूर्णपणे हायड्रोजन इंधनावर चालणार आहे. व्यावसायिकस्तरावर विक्री करण्यापूर्वी वाहनाची 12 ते 18 महिने चाचणी घेतली जाणार आहे. तसेच, इंधन भरण्यासाठी हायड्रोजन स्टेशन्सची उभारणीदेखील या कालावधीत केली जाईल. विशेष म्हणजे, मराठमोळे अधिकारी गिरीश वाघ यांच्या निरीक्षणाखाली या वाहनाची निर्मिती झाली आहे.

दिल्ली येथील भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो-2025मध्ये कंपनीने हायड्रोजन, इलेक्ट्रिक आणि सीएनजी CNG इंधनावर चालणारी पर्यावरणस्नेही वाहने सादर केली. यात सादर करण्यात आलेल्या हायड्रोजन(H2O) इंधनावरील प्राईमा ट्रकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या (आयओसी) सहकार्याने हायड्रोजन इंजिनवर चालणार्‍या या ट्रकची चाचणी केली जाणार आहे. नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनचा हा एक भाग आहे.

देशातील दोन संस्था या पथदर्शी चाचणीत सहभागी झाल्या आहेत. त्यात जमशेदपूर ते कलिंगनगर, मुंबई ते अहमदाबाद आणि मुंबई ते पुणे या मार्गांवर पुढील 12 ते 18 महिने हा ट्रक धाव घेईल. यादरम्यान वाहनाची व्यावहारिकतादेखील तपासली जाणार आहे. तसेच, इंधन भरण्यासाठी सुविधा कशी निर्माण करता येईल, याकडेही या कालावधीत लक्ष दिले जाईल.

आर्थिक वर्ष 2026 मध्ये टाटा प्राईमा एच-28 हा हायड्रोजनवरील ट्रक विक्रीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. हा देशातील पहिला हायड्रोजन इंधनावरील ट्रक ठरणार आहे. या ट्रकला चार सिलिंडरचे एच-2 आयसीई इंजिन असेल. याची क्षमता 550 किलोमीटर इतकी आहे. याबाबत माहिती देताना टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक आणि व्यावसायिक वाहन विभागाचे प्रमुख गिरीश वाघ म्हणाले, हायड्रोजन इंधनावरील ट्रकची चाचणी घेण्यासाठी तीन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. या मार्गांवर 15 ट्रक धावतील.

हायड्रोजन इंधन भरण्याच्या सुविधांचीही यावेळी चाचणी होईल. याशिवाय हायड्रोजन स्टेशन्सच्या उभारणीवरही या काळात काम केले जाईल. लांब पल्ल्याच्या मालवाहतुकीत हायड्रोजन इंजिनावरील वाहनाचा उपयोग कसा वाढविता येईल, याचाही अभ्यास होईल.

* वाहनाचे वैशिष्ट्य…

टाटा प्राईमा एच-28 ट्रक संपूर्णपणे हायड्रोजन इंधनावर चालेल

या वाहनाची अंदाजित रेंज

550 किलोमीटर आहे

कृषी माल वाहतूक, औद्योगिक माल आणि सिमेंट वाहतुकीसाठी करता येईल वापर

आरामदायी वाहतूक डोळ्यांसमोर ठेवून केली रचना

ट्रकद्वारे होणार्‍या प्रदूषणापासून मिळणार मुक्ती

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
32.8 ° C
32.8 °
32.8 °
61 %
3.8kmh
26 %
Wed
37 °
Thu
39 °
Fri
38 °
Sat
35 °
Sun
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!