24.5 C
New Delhi
Friday, March 14, 2025
Homeताज्या बातम्याउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे जिल्हा दौऱ्यावर; सासवड येथे होणार भव्य जाहीर सभा..!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे जिल्हा दौऱ्यावर; सासवड येथे होणार भव्य जाहीर सभा..!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुणे महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार - शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे

पुणे-

महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत भरभरून दिलेल्या आशीर्वादाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्यभर आभार यात्रा काढत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानत आहे. जालना येथे देखील आभार यात्रा काढत जाहीर सभे दरम्यान जनतेचे आभार मानले. याच पार्श्वभूमीवर दिनांक ३१ जानेवारी रोजी सासवड येथील पालखी तळ येथे आभार यात्रा काढून जनतेचे आभार मानणार आहेत. त्याचबरोबर पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात होणाऱ्या विश्व मराठी संमेलनास देखील भेट देणार असून या दोन्ही कार्यक्रमांच्या नियोजनार्थ शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन आढावा बैठक पार पडली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात महायुतीने विधानसभा निवडणूक लढवली. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकारने केलेली कामे, युवक, महिला, शेतकरी, विद्यार्थी, कष्टकरी या सर्वांसाठी आखलेली धोरणे या जोरावर नागरिकांनी महायुतीला विजयी केले. या विजयाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने राज्यभर आभार यात्रा सुरू आहे. नुकत्याच जालना येथे पार पडलेल्या आभार दौऱ्यात नागरिकांचे त्यांनी आभार मानले. तसेच यावेळी नियोजित सभेस नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या 31 जानेवारीला सासवडच्या पालखी तळ येथे आभार यात्रेनिमित्त सभा पार पडणार आहे. तसेच फर्ग्युसन महाविद्यालयात सुरू होणाऱ्या विश्व मराठी संमेलनास देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून या दोन्ही कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सासवड येथे होणाऱ्या आभार यात्रेस पुणे शहरातून हजारो शिवसैनिकांसह नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती नाना भानगिरे यांनी दिली. त्याचबरोबर येणाऱ्या काळात पक्ष संघटन वाढीसाठी एकजुटीने काम करून महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना विजयाचा झेंडा फडकविणार असल्याचा एकमुखी निर्धार पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी केला.


विधानसभा निवडणुकीत जनतेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेऊन महायुतीला भरघोस मतदान करत विजयी केले. येणाऱ्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील जनता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेऊन महायुतीला विजयी करतील. तसेच येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा पुणे महानगरपालिकेवर फडकविणार असल्याचा निर्धार केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
24.5 ° C
24.5 °
24.5 °
32 %
1.5kmh
99 %
Fri
35 °
Sat
36 °
Sun
34 °
Mon
34 °
Tue
34 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!