पिंपरी- विवाह ठरविताना मानपानासाठी हट्ट न करता स्नेह वाढविणे गरजेचे आहे. दोन कुटुंबे, दोन मने आणि परंपरा जपण्यासाठी मानपान बाजूला ठेवणे, ही काळाची गरज आहे. आताच्या पिढीचे विचार प्रॅक्टिकल आहेत. तरुणीही बिनधास्तपणे नोकरी करतात. त्यामुळे विवाहानंतर या तरुणींना समजून घेऊन त्यांच्या पंखाना बळ देण्याची भूमिका कुटुंबाने घेतली पाहिजे, असे आवाहन समुपदेशक विद्या जोशी यांनी विवाहेच्छुक तरुण – तरुणींच्या पालकांना केले.
तळेगाव दाभाडे येथील वैशाली मंगल कार्यालयात जोडी जमवा jodi jamavaमंडळाच्या वतीने मराठा समाजातील विवाहेच्छुक तरुण – तरुणींसाठी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात दीडशेहून अधिक वधू – वरांनी vadhu-var सहभाग नोंदवला. त्यांना मार्गदर्शन करताना समुपदेशक विद्या जोशी बोलत होत्या. यावेळी पत्रकार योगेश्वर माडगूळकर , कामगार नेते अनिल टकले, अनिल खुळे, आयोजक मनिषा सांडभोर, मंगेश सांडभोर, तुषार क्षीरसागर, राजेंद्र मिरगे, राजेश सरोदे, संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्या जोशी म्हणाल्या, की आज मराठा समाज महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने आहे. या समाजातील अनेक मुले-मुली उच्च शिक्षित आहेत. अलिकडे एकत्र कुटुंब पद्धती जास्त राहिली नसल्यामुळे मुला-मुलींची लग्न जमविताना अडचणी येत आहेत. त्यासाठी आज वधू-वर सूचक मंडळाची नितांत आवश्यकता असून, ही काळाची गरज आहे.
अनिल टकले म्हणाले, व्यवसाय, नोकरी, उद्योगधंदे व शिक्षणानिमित्त समाज विखुरला गेलेला आहे. त्यामुळे लग्न जमविताना मोठ्या अडचणी येतात. समाजाला एका छताखाली आणून त्यांना वधू-वर यांच्या मुलाखतीद्वारे समक्ष पाहण्यासाठी अशा मेळाव्यातून साध्य होत आहे.
मंगेश सांडभोर म्हणाले, की आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उद्देशाने सामाजिक भावनेतून मराठा तरुण तरुणीचे लग्न जमविण्याचे व्रत हाती घेतले आहे. भविष्यात याला भव्य स्वरूप द्यायचे आहे.
सूत्रसंचालन व आभार मनीषा सांडभोर यांनी मानले.