पुणे, : देशाच्या एकात्मेचे आणि विविधतेचे प्रतीक असलेले भारतातील सर्वात मोठा भारतीय लोकनृत्य महोत्सव ‘जयंती जय मम भारतम’ २०२५ ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये समाविष्ठ करण्यात आले आहे. युनिव्हर्सल ट्राइब्स आणि रजत रमेश रघतवान यांच्या अथक परिश्रमाने देशासाठी ही अभिमानास्पद गोष्ट ठरली आहे. तसेच कोरियोग्राफर सुभाष नकाशे यांनी नृत्याला वेगळीच उंची दिली आहे तसेच संगीत नाटक अकादमीचे मनीष मंगाई यांचे बहुमूल्य योगदान लाभले आहे
या लोकनृत्यामध्ये ५ हजार पेक्षा अधिक कलाकारांचा सहभाग आणि ५० पेक्षा अधिक विविध पारंपरिक लोकनृत्याचे सादरीकरण करण्यात आले. दिल्लीत आयोजित या ऐतिहासिक सोहळ्याला सन्माननीय केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, संयुक्त सचिव श्रीमती उमा नंदुरी आणि संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा उपस्थित होत्या.
देशाच्या ७६व्या प्रजासत्ता दिनाच्या गौरावशाली प्रसंगी केंद्रीय संस्कृती मंत्रालय आणि संगीत नाटक अकादमी यांच्या सहकार्याने ‘जयंती जय मम भारतम’ २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील ठळक आकर्षणपैकी एक म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी होळी नृत्य, ज्यामध्ये भंगारपाणी
आणि आडगाव गावातील ५० आदिवासी कलाकारांनी सहभाग घेतला होता. या कलाकारांनी आपली कला तर सादर केली. ती त्यांच्या स्वप्नपूर्तीची यात्रा होती. विशेष म्हणजे यातील ४५ पेक्षा अधिक नर्तकांना हिंदी किंवा मराठी भाषा येत नव्हती तरी त्यांनी केवळ त्यांच्या स्थानिक आदिवासी भाषेतच संवाद साधला.
केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत म्हणाले,” भगवान बिरसा मुंडा यांची १५०वीं जयंती साजरी करत असतांना आदिवासी नृत्याने विश्व रेकॉर्ड रचला आहे. ५ हजार आदिवासी कलाकारांनी १ महिना अथक परिश्रम करून सादर केलेले हे नृत्य देशातील एकतेचे प्रतिक आहे. या कलेमुळे आदिवासी सांस्कृती, परंपरा जनतेला कळली आहे.”
या संदर्भात कलाकार गौतम खरडे म्हणाले,” महाराष्ट्रातील आदिवासी नृत्याचा गौरवाचा क्षण म्हणजे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड में नाव समाविष्ठ करणे आहे. आज महाराष्ट्रातील या नृत्याची ओळख संपूर्ण जगभर पोहचेल. यावेळी आम्ही होळीला सादर केले जाणारे भोद्या व बावा नृत्य सादर केले.
युनिव्हर्सल ट्राइब्स आणि रजत रमेश रघतवान यांनी या सर्व कलाकरांचा खर्च उचला आहे. दिल्लीत आयोजित या सोहळ्याने महाराष्ट्रातील आदिवासी कलाकारांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. रजत रमेश रघतवान यांच्या समर्पणामुळे भारताच्या सांस्कृतिक वारशाच्या जतन आणि संवर्धनाचा महत्वाचा टप्पा गाठला आहे. ही एक अविस्मरणीय ऐतिहासिक घटना ठरली आहे.