28 C
New Delhi
Monday, August 25, 2025
Homeताज्या बातम्यानागरी सुविधा उपलब्ध करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास कटिबद्ध- ना. चंद्रकांत पाटील

नागरी सुविधा उपलब्ध करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास कटिबद्ध- ना. चंद्रकांत पाटील

पुणे – नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी दिली. ना.चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून कोथरुड मतदारसंघातील ओरवी, सेवन्थ ॲव्हेन्यू, विझडम पार्क, अटलॅंटा, कुलहोम्स सोसायटीच्या मागणीनुसार एमएनजीएलचे कनेक्शन उपलब्ध करून देण्यात आले. याचे लोकार्पण झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी एमएनजीएलचे लोकेश सरोदे, नगरसेविका स्वप्नाली सायकर, प्रल्हाद सायकर , उमा गाडगीळ, भाजपा कोथरूड उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, लहु बालवडकर, राहुल कोकाटे, मोरेश्वर बालवडकर, सचिन दळवी, रुपाली रायकर, नयन चौधरी, सचिन पाटील यांच्या सह सोसायटीचे सदस्य आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना.चंद्रकांत.पाटील म्हणाले की, कोथरुड विधानसभा मतदारसंघातील मतदारसंघातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेऊन अडचणी समजून घेतल्या. यामध्ये मतदारसंघातील जमीन अधिग्रहणासाठी ३२५ कोटीची आवश्यकता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, त्यातील १५० कोटी रुपये राज्य सरकारकडून आणण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मतदारसंघातील रस्ते विकासाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे कोथरूड मतदारसंघातील नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
28 ° C
28 °
28 °
82 %
3.7kmh
100 %
Mon
28 °
Tue
35 °
Wed
35 °
Thu
36 °
Fri
34 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!