20.1 C
New Delhi
Friday, October 24, 2025
Homeदेश-विदेशश्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास माघी यात्रेत 3 कोटी 3 लाखाचे उत्पन्न

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास माघी यात्रेत 3 कोटी 3 लाखाचे उत्पन्न

पंढरपूर :- माघ यात्रा कालावधीत भक्तांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी vithal Rukmini मातेच्या चरणी लाखो रुपयांचे दान केले तसेच सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले. मंदीर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, पुजा, फोटो विक्री आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून मंदिरे समितीस 3 कोटी 3 लाखाचे उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

माघ यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक आले होते. माघ शुध्द 01 (दिनांक 30 जानेवारी) ते माघ शुध्द 15 (दिनांक 12 फेब्रुवारी) या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ 3233420 रुपये अर्पण, 8034128 रुपये देणगी, 4081000 रुपये लाडू प्रसाद विक्री, 3683969 रुपये भक्तनिवास , 888800 पुजेच्या माध्यमातून, 8648152 रुपये हुंडीपेटी , 1039707 रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच फोटो, महावस्त्रे, शेणखत, गोमुत्र, मोबाईल लॉकर, जमा पावती, चंदन आदी माध्यमातून 697640 रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे.

मागील वर्षी श्रींच्या चरणाजवळ 3247774 रुपये अर्पण , 8902798 रुपये देणगी, लाडूप्रसाद विक्रीतून 3944000, भक्तनिवास 5090721 रुपये, 728600 रुपये पुजेच्या माध्यमातून, 11598739 रुपये हुंडीपेटीतून, 515805 रुपयाचे सोने-चांदीचे दागिणे अर्पण, तसेच फोटो, महावस्त्रे, शेणखत, गोमुत्र, मोबाईल लॉकर, जमा पावती, चंदन आदी माध्यमातून 994082 रुपये प्राप्त झाले होते.

सन 2024 च्या माघी यात्रेत रू.35022519/- व या वर्षीच्या यात्रेत रू.30306816/- इतके उत्पन्न प्राप्त असून, मागील यात्रेच्या तुलनेत रू.4715703/- इतकी घट झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने सुमारे 4 लाख 50 हजार लाडूप्रसादाची विक्री झाली असून, सुमारे 52 ग्रॅम सोने व 6 किलो चांदीच्या वस्तू प्राप्त झालेल्या आहेत. या मिळालेल्या दानातून श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या वारकरी भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील असेही यावेळी श्री श्रोत्री यांनी सांगीतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
20.1 ° C
20.1 °
20.1 °
77 %
0kmh
0 %
Thu
27 °
Fri
33 °
Sat
33 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!