23.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
HomeBlogकाँग्रेसचा बडा नेता लवकरच करणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश?

काँग्रेसचा बडा नेता लवकरच करणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश?

पुणे : राजकारणात करिअर घडवण्यासाठी कार्यकर्ता आपला संपूर्ण वेळ आणि मेहनत झोकून देतो. मात्र, काही नेते कार्यकर्त्यांना मोठं होण्याची संधी देत नाहीत. याच कारणामुळे पुण्यातील काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील आणि त्यांच्या सोबत काही अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. अद्याप प्रवेशाची ठोस तारीख निश्चित झालेली नसली, तरी चर्चासत्रे आणि भेटीगाठींचे अंतिम टप्पे पार पडले आहेत.

रोहन सुरवसे पाटील हे काँग्रेसचे आक्रमक युवा नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी विविध आंदोलनांत सक्रिय सहभाग घेतला आहे. खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाला समर्थन देत त्यांनी सारसबाग येथील सावरकर पुतळ्याजवळ “माफीवीर” असा बॅनर लावला होता. यानंतर त्यांना पोलिस कोठडीला सामोरे जावे लागले आणि ५० हजारांच्या जामिनावर मुक्तता मिळाली. त्यानंतरही त्यांनी काँग्रेसमध्ये सक्रिय राहून पक्षसंघटनासाठी काम केले.

तथापि, अनेक वर्षे पक्षासाठी झटूनही संधी मिळत नसल्याची भावना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. याशिवाय, शहरातील वरिष्ठ नेते संघटन कार्यात मदत करत नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही काँग्रेसमध्ये जुन्याच पदाधिकाऱ्यांना संधी दिली जात आहे. या सर्व कारणांमुळे रोहन सुरवसे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काँग्रेसला रामराम करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या संदर्भात पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांच्यासोबत बैठक पार पडली आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसला आणखी काही पदाधिकाऱ्यांच्या विभक्त होण्याला सामोरे जावे लागू शकते.

सूत्रांच्या माहितीनुसार, या संदर्भात पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांच्यासोबत बैठक पार पडली आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसला आणखी काही पदाधिकाऱ्यांच्या विभक्त होण्याला सामोरे जावे लागू शकते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
23.1 ° C
23.1 °
23.1 °
38 %
1.5kmh
0 %
Thu
24 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °
Mon
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!