पिंपरी- संत तुकाराम नगर एसटी स्थानक पिंपरी चिंचवड येथे दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे दुर्गा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष दुर्गा भोर छावा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष श्री अभय भोर आणि सहकाऱ्यांनी स्टेशनची पाहणी केली यावेळी संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कुंभार साहेब संत तुकाराम नगर एसटी स्थानकाचे आगार प्रमुख बालाजी मारुतीराव सूर्यवंशी (पाटील)आगार व्यवस्थापक श्रीमती वैशाली कांबळे स्थानक प्रमुख आणि व्यवस्थापन उपस्थित होते यावेळी परिसरामध्ये सुरक्षारक्षकांची कमतरता जाणवली मुख्य म्हणजे एसटी स्थानकाला गेटच नसल्यामुळे अनेक गाड्या आत मध्ये आणल्या जातात काचा लावून अनेकदा तासंतास या गाड्या या ठिकाणी उभे असतात त्यामुळे स्थानकास जास्तीत जास्त जास्तीत जास्त सुरक्षारक्षक असणे आवश्यक आहे सध्या फक्त तीन सुरक्षारक्षक सात एकर क्षेत्र असलेल्या एसटी स्थानकास आहेत या ठिकाणी पुणे मेट्रो वाहन दलासाठी जागा दिलेली आहे.

मात्र या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस निर्मनुष्य अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झालेला आहे या संदर्भात मेट्रो व्यवस्थापनास या ठिकाणी सुरक्षा रक्षक असणे गरजेचे आहे एसटी आगारातील महिलांसाठी हिरकणी कक्षाची पाहणी करण्यात आली तसेच परिसरात काही वृक्षाच्या फांद्या काढणे आवश्यक असून त्यामुळे तेथे लाईट मोठ्या प्रमाणात पडतील अनेक भागांमध्ये राडाराडा मोठ्या प्रमाणात पडलेला दिसला सी सी कॅमेरे हे जास्त संख्येने असण्याची आवश्यकता आहे या ठिकाणी 200 गाड्या या रोज निवासी असतात या ठिकाणी सदर विभागातील पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कुंभार साहेब यांना सांगून रात्रीच्या वेळेस गस्त वाढविण्याची मागणी करण्यात आली एसटी स्थानकाच्या बाजूलाच आयटी कंपनी आहे आणि मेट्रो स्टेशन या ठिकाणी अनेक तरुणी या जात येत असतात त्यामुळे पुढील काळामध्ये आत्ताच खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे दुर्गा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष दुर्गा भोर यांनी सदर व्यवस्थापनास आणि पोलीस विभागास याची कल्पना देऊन पुढील गोष्टीसाठी दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे सुद्धा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले.
