पुणे, – : ग्लेनमार्क फार्मास्यूटिकलची कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी शाखा असलेल्या ग्लेनमार्क फाउंडेशनचा ग्लेनमार्क न्यूट्रिशन अवार्ड २०२५ हा पुरस्कार पुण्यातील स्नेह फाउंडेशन या संस्थेला मिळाला. नाविन्यता, प्रभाव आणि शाश्वतता या माध्यमातून कुपोषणाशी सामना करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांचे हे पाचवे वर्ष असून त्यातून या कार्यासाठी ग्लेनमार्कची कटिबद्धता अधोरेखित झाली आहे. ग्लेनमार्कची प्रक्रिया भागीदार इडोब्रो, शाश्वतता भागीदार यूएन ग्लोबल कॉम्पॅक्ट नेटवर्क इंडिया upn global compact network india आणि इकोसिस्टीम भागीदार इम्पॅक्ट फोर न्यूट्रिशन या संस्थांच्या सहकार्याने हे पुरस्कार देण्यात येतात.
या पुरस्कारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला असून त्यासाठी २२ राज्यातील १६८ जिल्ह्यांमधून ४०३ प्रवेशिका आल्या होत्या. त्यामधून स्नेह फाउंडेशन सोबतच ग्रामीण एनजीओचा NGO पुरस्कार पश्चिम बंगालमधील बैकुंठपूर तरुण संघ, सुंदरबन या संस्थेला तर अन्य वर्गातील पुरस्कार राजस्थानच्या जयपूर येथील महावीर इंटरनॅशनल फाउंडेशन ट्रस्ट या संस्थेला जाहीर करण्यात आला आहे. तिन्ही विजेत्या संस्थांना त्यांच्या जिल्ह्यांमध्ये परिवर्तनकारी प्रकल्प राबविण्यासाठी प्रत्येकी दोन लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे.
ग्लेनमार्क फाउंडेशनने कुपोषणाला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणून महत्त्व दिले असून ० ते ६ वर्षे वयोगटातील मुलांवर तसेच गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या मातांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. विविध कार्यक्रम आणि हस्तक्षेपांद्वारे कुपोषणाशी लढण्याच्या दृष्टिकोनाचा वापर फाउंडेशनने केला आहे. या अंतर्गत कुपोषण दूर करण्यासाठी आणि भारताच्या विविध प्रदेशांमध्ये समग्र पोषण उपायांना प्रोत्साहन देण्यासाठी सामूहिक संकल्पाची पुष्टी करणे हे ग्लेनमार्क न्यूट्रिशन अवॉर्ड्सचे उद्दिष्ट आहे.
स्नेह फाउंडेशनला अर्बन एनजीओच्या श्रेणीत विजेता घोषित करण्यात आले. त्याबद्दल स्नेह फाउंडेशन च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रद्धा देव म्हणाल्या की “हा पुरस्कार जिंकणे हे आमच्या टीमच्या, विशेषतः सामुदायिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या, बाल कुपोषण दूर करण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचे प्रतीक आहे. या अनुदानामुळे आम्हाला आमची पोहोच वाढवता येईल, लवकर निदान सुधारता येईल आणि जीव वाचवणारे शाश्वत हस्तक्षेप राबवता येतील. या सन्मानाबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत आणि मुलांसाठी निरोगी भविष्य निर्माण करण्याच्या आमच्या ध्येयात समर्पित राहू.”
याप्रसंगी महाराष्ट्र सरकारच्या माता-बाल आरोग्य आणि पोषण अभियानाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. राजू जोतकर म्हणाले, “निष्पक्षता, पारदर्शकता आणि प्रभाव यांची निश्चिती देणाऱ्या सुसंरचित चौकटीमध्ये राहून ग्रँड ज्यूरीचा सदस्य म्हणून काम करणे हा एक आनंददायी अनुभव होता. विविध भौगोलिक प्रदेशांतील पुरस्कार विजेत्यांमुळे या उपक्रमाची प्रामाणिकता आणि स्पर्धात्मकता दिसून येते. भारताचे पोषण संक्रमण आणि स्थूलतेबाबत वाढत्या चिंता लक्षात घेता, भविष्यातील उपक्रमांमध्ये जास्त वजनाशी संबंधित आरोग्य जोखमींचाही विचार व्हायला हवा. असंसर्गजन्य रोगांशी लढण्यासाठी राष्ट्रीय प्रयत्नांशी ते सुसंगत असतील. पोषण पुरस्काराच्या या उपक्रमामुळे भारताचे आरोग्य आणि कल्याण बळकट होत राहतील, अशी मला प्रामाणिकपणे आशा आहे.”
याप्रसंगी बोलताना ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या कॉर्पोरेट सर्व्हिसेसच्या कार्यकारी संचालक चेरिल पिंटो म्हणाल्या, “ग्लेनमार्क फाउंडेशनमध्ये आमचा असा विश्वास आहे की निरोगी मुले ही निरोगी जगाचा पाया असतात. पोषणाबाबत आमच्या कटिबद्धतेतून सामाजिक कल्याणासाठी दीर्घकालीन दृष्टीकोन प्रतिबिंबित होतो. या वर्षी पुरस्कारासाठी आवेदनांतून केवळ पोषण सुधारण्या साठीची धोरणे दिसली नाहीत, तर शाश्वत व दीर्घकालीन उपायांचा शोधही घेण्यात आला. दूरदृष्टी, नावीन्यपूर्णता आणि रणनीतीच्या मदतीने आपण कुपोषणाचा सामना करू शकतो हे या विजेत्यांनी दाखवून दिले आहे. जिथे प्रत्येक मुलाला पोषण मिळेल आणि प्रत्येक समुदाय शाश्वत जगात भरभराटीला येईल, अशा भविष्यासाठी आम्ही काम करत आहोत.