नोंदणी १९ – २१ मार्च २०२५ दरम्यान sws.cept.ac.in येथे करता येणार
- ऑनलाइन, विद्यापीठच्या आवारात, किंवा परदेशी जाऊन शिक्षणाचे ५० विविध अभ्यासक्रम
- परदेशी जाऊन शिक्षण घेण्यासाठी पॅरिस, व्हेनिस, मॉस्को, क्वालालंपूर, सिंगापूर असे विविध पर्याय उपलब्ध
पुणे, : सेप्ट विद्यापीठाने २०२५ च्या उन्हाळी सतरासाठीचे ऐच्छिक अभ्यासक्रम नुकतेच जाहीर केला आहे. बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना तसेच व्यावसायिकांना हा अभ्यासक्रम खुला आहे. त्यांनी निवडलेल्या अभ्यासक्रमाशी त्यांचे शिक्षण किती सुसंगत आहे या आधारावर त्यांची नोंदणी होईल. इच्छुक विद्यार्थंकडून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी १९ मार्च २०२५, दुपारी १२ पासून सुरु होईल आणि २१ मार्च २०२५ ला सायंकाळी ६ पर्यंत स्वीकारली जाईल.
ऑनलाइन आणि भारतात / परदेशात प्रवास पद्धतीने शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी १९ मे २०२५ पर्यंत आणि सेप्टच्या आवारात शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी २६ मे २०२५ पर्यंत उन्हाळी अभ्यासक्रम सुरू होण्याच्या तारखा नोंदणी करता येईल. नोंदणी आणि अभ्यासक्रम याविषयी माहिती
https://sws.cept.ac.in/ येथे उपलब्ध आहे
सेप्ट विद्यापीठाचे उन्हाळी आणि हिवाळी ऐच्छिक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण, सखोल आणि परंपरागत वर्गाखोलीबाहेर चे अनुभव देऊन ज्ञानात मौल्यवान भर टाकणारे असतात. सेप्ट विद्यापीठाने युरोप मधील शिक्षणपद्धतीतील उन्हाळी आणि हिवाळी अभ्यासक्रमांची आधुनिक संकल्पना भारतात तुलनेने ब-याच आधी सुरू केली. ही दोन सत्रे – उन्हाळी आणि हिवाळी – दोन ते चार आठवड्यांची असतात आणि या कालावधीत विद्यार्थ्यांना बहुशाखीय शिक्षणाची संधी मिळवून देतात.
विद्यार्थ्यांना सहाध्यायींच्या सहवासात शिकण्याला प्रेरित करणे, विचारांचे आदानप्रदान घडवून आणणे आणि विद्यार्थ्याना त्यानी निवडलेल्या अभ्यासक्रमांचा शैक्षणिक चौकटीबाहेर जाऊन विचार कण्यास प्रवृत्त करणे हे या उन्हाळी – हिवाळी अभ्यासाक्रमांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. म्हणूनच सेप्ट सर्व विद्यापीठांच्या आणि सर्व विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांत दाखल होण्यास उत्तेजन देते. या अभ्यासक्रमाचा अपेक्षित परिणाम साधी व्हावा यासाठी व्यावसायिक, अध्यापक, कलावंत आणि विविध क्षेत्रातील भारतीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ विद्यार्थ्यांना शिकवतात.
या वर्षी सेप्ट ने २०२५ च्या उन्हाळी सत्रात वैविध्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध केले असून त्यांत पॅरिस सारख्या शहरांतला नगर विकास ते भूतान मधील कणखर नागरी टिकाऊपणा इतकी मोठी व्याप्ती आणि विविधता आहे. यातील निवडक वैशिष्ट्यीकृत विषयांमध्ये डिकोडिंग मेकॅनिक्स, प्रकाशयोजनाद्वारे रात्रीच्या वेळी अंधाराचे जतन करणे; किंवा इमॅजिन्ड लँडस्केप्स: अ सिनेमॅटिक मॅपिंग ऑफ पॅरिस यांचा समावेश आहे. अशा ५० अभ्यासक्रमांमधून विद्यार्थ्यांना निवड करता येईल आणि प्रत्यक्ष विद्यापीठ आवारात, ऑनलाइन आणि भारत / परदेशात प्रवास करत अभ्यासक्रम पूर्ण करता येईल.

देशांतर्गत किवा परदेशी प्रवास करून उन्हाळी / हिवाळी अभ्यासक्रम पूर्ण करण्याला मोठी पसंती असून अशा अभ्यासक्रमांत एखाद्या विषयात गढून जाऊन प्रयोग करत शिकण्याची संधी मिळवत विद्यार्थी विविध संस्कृतींचा तसेच बांधकामांच्या वास्तुशास्त्रीय दृष्टीकोणातून अभ्यास करू शकतात. यावर्षी विद्यार्थ्यांना जपान ला जाऊन तिथल्या बांधकामांमधून दिसणारा संस्कृती, परंपरा आणि नवनिर्मिती यांचा मिलाफ पाहता येईल. सर्जनशील वृत्तीच्या विद्यार्थ्यांना अंदमान बेटांमधील ओशनिक टेल्स द्वारा पाण्याखालील चित्रीकरण तसेच परिसरातील विविध प्रजातींच्या रक्षणासाठी डिझाइन चा वापर याविषयी ज्ञान मिळविता येईल.
या अभ्यासक्रमांचे फायदे अधोरेखित करताना उप प्राचार्य प्रा. चिरायू भट म्हणाले , सेप्ट चे उन्हाळी आणि हिवाळी ऐच्छिक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने आखण्यात आले आहेत. इतर विद्यार्थ्यांच्या सह शिकताना त्यांना विविध दृष्टीकोण मिळतात आणि गुण संचय करून त्यांना अभ्यासक्रम निवडण्यात लवचिकता मिळवता येते. या अभ्यासक्रमांचे स्वरूप बहुशाखीय असल्यामुळे कल्पक अध्यापन पद्धतीने शिकत विद्यार्थी नवीन क्षेत्रांचा अभ्यास करू शकतात आणि आपले बौद्धिक क्षितिज रुंदावू शकतात .