पुणे – : ध्रुव ग्लोबल स्कूल, नांदेचा एक आशादायक स्पीड स्केटर ध्यान जोशी ने बंगळुर येथे झालेल्या ६२ व्या राष्ट्रीय रोलर स्केेटिंग चॅम्पियनशिपमध्ये आपले वर्चस्व दाखविले आहे. स्केटिंगपटूंच्या वेगाची जणू ही परीक्षाच घेणार्या या स्पर्धेत जोशी ने अप्रतिम कामगिरी केली. या स्पर्धेमध्ये त्यांने कास्य पदक पटकावले.
९ ते ११ या मुलांच्या गटात भाग घेत जोशी ने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सातत्याने आपल्या प्रतिभेची चुणूक दाखविली आहे. एक तरूण प्रतिभेपासून ते राष्ट्रीय विजेत्यापर्यंतचा त्याचा प्रवास त्याच्या खेळाप्रती असलेल्या समर्पणाची आणि आवडीची साक्ष देतो. या स्पर्धेत त्याचे उल्लेखनीय कौशल्य, लक्ष केंद्रित करणे आणि जी खिलाडीवृत्ती दाखविली त्याचे समर्पण आणि कठोर परिश्रम प्रशंसनीय होते.
त्याच्या अपवादात्मक कामगिरीबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी व प्रिन्सिपल संगीता राउत यांनी शुभेच्छा दिल्यात. ध्रुव ग्लोबल स्कूुलच्या स्केटिंग प्रशिक्षण केंद्रात ध्यान जोशी ने प्रशिक्षण घेतले आहे. या पूर्वी ही स्केटिंग स्पर्धेत प्रतिनिधित्व करत त्याने पदकांची लयलूट केली आहे.
६२ व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये ‘ध्यान जोशी’ ला कांस्य पदक
New Delhi
haze
14.1
°
C
14.1
°
14.1
°
54 %
2.6kmh
0 %
Wed
16
°
Thu
22
°
Fri
23
°
Sat
24
°
Sun
24
°


