30.4 C
New Delhi
Saturday, July 5, 2025
Homeमहाराष्ट्रमहानगरपालिकेची कॅश काऊंटर रात्री १२ पर्यंत उघडी राहणार…

महानगरपालिकेची कॅश काऊंटर रात्री १२ पर्यंत उघडी राहणार…

नागरिकांच्या सोयीसाठी करसंकलन विभागाची विशेष सेवा…

पिंपरी : आर्थिक वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक असताना करदात्यांना आपला कर भरण्यास सोयीचे व्हावे यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाने करसंकलन कार्यालये व कॅश काऊंटर्स २९ मार्चपर्यंत सकाळी ९.४५ ते रात्री ०९ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत असे करसंकलन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर, शनिवार २९ मार्च, रविवार ३० मार्च, गुढीपाडव्याच्या दिवशी व ३१ मार्च आर्थिक वर्षाचा शेवटच्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत (शेवटचा व्यक्ती येईपर्यंत) कॅश काऊंटर्स सुरु ठेवण्याचा निर्णय करसंकलन विभागाने घेतला असून नागरिकांनी तात्काळ आपल्या कराचा भरणा करण्याचे आवाहन सुध्दा करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ताकर वसुलीचे १००० कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने महापालिकेमार्फत नागरिकांना विविध माध्यमातून कराचा भरणा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सदर कालावधीमध्ये मालमत्ताकर भरण्यासाठी कॅश काऊंटर्स (भरणा केंद्रे) उशिरापर्यंत चालू राहतील. तसेच सदर काऊंटर्स अगदी गुढीपाडवा असला तरी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही चालू राहतील, अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
30.4 ° C
30.4 °
30.4 °
63 %
4kmh
81 %
Sat
31 °
Sun
38 °
Mon
33 °
Tue
36 °
Wed
34 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!