17.1 C
New Delhi
Tuesday, January 13, 2026
Homeमहाराष्ट्रएमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे तीन दिवसीय इनोव्हेशनले छलांग ‘हॅक एमआयटी-डब्ल्यूपीयू’ २६ पासून

एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे तीन दिवसीय इनोव्हेशनले छलांग ‘हॅक एमआयटी-डब्ल्यूपीयू’ २६ पासून

पुणे, – विद्यार्थ्यांमध्ये इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि इनव्हेंशनची संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे ले छलांग ‘हॅक एमआयटी-डब्ल्यूपीयू’ २०२५ ही तीन दिवसीय स्पर्धा २६ ते २८ मार्च २०२५ या दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती एमआयटीचे संस्थापक विश्वस्त व एमआयटी टीबीआयचे संचालक प्रा. प्रकाश जोशी, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस व प्र कुलगुरू व कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मिलिंद पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ही स्पधार् तृतीय, चतुर्थ, यूजी, पीजी व पीएचडीच्या विद्यार्थ्यांमध्ये होणार आहे. यात आयडियाथॉन, वर्क्याथॉन, फॉर्माथॉन, बायो-थॉन, डिझाईन थॉन, हॅक-एआय-थॉन, आणि ऑक्टॅथॉन या गटात होईल. प्रमुख वैशिष्टये म्हणजे महिला सशक्तीकरण करण्यासाठी त्यांना व्यावसायिक एक उत्कृष्ट व्यासपीठ निर्माण करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःची कल्पना साकार करणे, त्याला मूर्तरूप देणे आणि ऑक्टॅथॉन म्हणजे ८ तासात स्पर्धकाने एखाद्या समस्येचे समाधान शोधून काढून त्याचे प्रारूप तयार करावयाचे आहे. या सर्व गटांसाठी एकूण ८५४ समस्या विद्यापीठाला प्राप्त झाले आहेत. त्यासाठी ४६८ मेंटॉर नियुक्त करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी व्यावसायीक जगातील प्रसिद्ध व्यक्ती, आर्थीक दृष्ट्या सक्षम झालेल्या स्टार्टअप जगतातील प्रमुख व्यक्ती व विद्यापीठाचे माजी विद्यार्थी हे ज्यूरी म्हणून उपस्थित राहतील व मार्गदर्शन करतील. यामध्ये वैज्ञानिक व अवैज्ञानिक असे शेकडो समस्या स्टेटमेंट्स हे विविध कंपन्यांकडून प्राप्त झाले आहेत. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, विज्ञान, आरोग्य, बिजनेस अ‍ॅण्ड लिडरशीप, आर्टस, ह्यूमॅनिटीस अ‍ॅड प्रोफेशनल्स स्टडिज, सार्वजनिक आरोग्य इ. क्षेत्रातील ७००० स्पर्धक सहभागी झाले आहेत. प्रत्येक गटातील प्रथम दोन विजेत्यांना रोख पारितोषिके व मेडेल देण्यात येणार आहेत. तसेच स्टार्टअप फंडिंग सुद्धा देण्यात येणार आहे.
ले छलांग ‘हॅकएमआयटी-डब्ल्यूपीयू’ २०२५ मध्ये एमआयटी डब्ल्यूपीयूच्या विद्यार्थी १०० पेक्षा अधिक स्टार्टअप ची प्रदर्शनी आयोजित करणार आहेत. ही सर्वांसाठी निःशुल्क असेल.
  डॉ. आर.एम.चिटणीस यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जानेवारी हा दिवस स्टार्ट अप डे म्हणून घोषित केला आहे. त्यावर एमआयटी डब्ल्यूपीयू ने पुढचे पाऊल उचलून स्पर्धा आयोजित केली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये उद्योजकतेला खतपाणी घालण्यासाठी नवनिर्मिती आणि नवीन संकल्पना आत्मसात करण्याची वेळ आली आहे. या स्पर्धेतून नवे उद्योजक निर्माण होऊन देश प्रगतीपथावर जाईल.
डॉ. मिलिंद पांडे यांनी सांगितले की,‘माइंड टू मार्केट’ आणि ‘ पेपर टू प्रोडक्ट’ ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी ही स्पर्धा महत्वाची आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना वाव देऊन त्याला चालना द्यावी व त्यांची बौध्दिक क्षमता वृद्धिंगत करून त्यांना उद्योजक बनविण्याचे धोरण प्रत्यक्षात आणण्याचा हा एक स्तुत्य प्रयत्न आहे. देशात नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणार्‍यांची संख्या वाढवायची आहे. आत्मनिर्भर भारत आणि स्टार्ट अप इंडिया संस्कृती वाढविण्यासाठी या स्पर्धेतून मदत होणार आहे.
या स्पर्धेसाठी अनेक कंपन्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्याचे व त्यांच्या प्रोजेक्टला सक्रिय मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या को क्रिएशन या संकल्पनेवर आधारित प्रथम वर्षाच्या ५०० विद्यार्थ्यांनी ले छलांग सहभाग नोंदविला आहे.
ले छलांग ‘हॅकएमआयटी-डब्ल्यूपीयू’ २०२५ या स्पर्धेचे उद्घाटन बुधवार, २६ मार्च रोजी सकाळी १० वा. होईल. एमआयटी शिक्षण संस्था समुहाचे संस्थापक प्रा.प्रकाश जोशी हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहतील. तसेच, अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड असतील. तसेच ब्लू ओशन स्टील्सचे सीईओ डॉ. पंकज जैन, नॉर्दर्न ट्रस्ट कॉर्पोरेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चरचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश कोरडे आणि रिलायन्स जिओचे सीईओ व वरिष्ठ उपाध्यक्ष सतीश शर्मा हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
२८ मार्च रोजी संध्याकाळी ५.०० वा. होणार्‍या पारितोषिक समारोप समारंभ प्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे अध्यक्षस्थानी असतील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
17.1 ° C
17.1 °
17.1 °
45 %
2.1kmh
20 %
Tue
20 °
Wed
21 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!