30.1 C
New Delhi
Saturday, May 10, 2025
HomeTop Five Newsराष्ट्रनिर्माणासाठी अनोखा पुढाकार

राष्ट्रनिर्माणासाठी अनोखा पुढाकार

तीन हजार विद्यार्थ्यांना भारतीय सेनेत सामील होण्यासाठी मिळाले प्रोत्साहन

पुणे :- भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी युवकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ’युगांतर 2047’ या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुण्यातील नामांकित शिक्षण संस्थांमधील तीन हजार एनसीसी (NCC) विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेत भारतीय लष़्क़र आणि पुनीत बालन (punit balan Group) ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रनिर्माणासाठी पुढाकार घेत या प्रेरणादायी सेमिनारचे आयोजन केले होते. युवक, योग आणि तंत्रज्ञान हे भारताच्या प्रगतीचे आधारस्तंभ असलेल्या या विषयावर विद्यार्थ्यांमध्ये सखोल चर्चा झाली.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल अनूप शिंगल, एव्हीएसएम, एस.एम, महासंचालक, सैन्यभरती, नवी दिल्ली यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मे. जन. योगेश चौंधरी, व्हिएसएम, एडीजी, झेआरओ पुणे, पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन, आरएमडी फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल- बालन, निवृत्त ब्रिगेडीयर सैरभसिंह शेखावत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

‘विकसित भारत’ या संकल्पनेवर बोलताना लेफ्टनंट जनरल शिंगल यांनी भारतीय सैन्याच्या राष्ट्रनिर्माणातील महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला आणि युवकांनी सैन्यात भरती होऊन देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन केले. त्यांच्या प्रभावी भाषणाने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती आणि जबाबदारीची जाणीव निर्माण केली.
’पुनीत बालन ग्रुप’च्या सहकार्याने आयोजित या सेमिनारमध्ये अनेक उपक्रम झाले त्यात वरिष्ठ सैन्य अधिकार्यांकडून प्रेरणादायी व्याख्याने, करिअर मार्गदर्शन सत्र, भारतीय सैन्यातील संधींबाबत माहिती, एनडीए कॅडेट्सचे अनुभव, विशेष प्रेरणादायी भाषण ज्यात – जया किशोरी यांचे, शिस्त आणि चिकाटीचा महत्त्व पटवून देणारे व्याख्यान उपस्थित विद्यार्थ्यांना विशेष भावले.
यावेळी सैन्य दलाच्या विविध शस्त्रास्त्रांचे प्रात्यक्षिक प्रदर्शन आणि आधुनिक लष्करी तंत्रज्ञानाची झलक हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. प्रसिद्ध मेंटलिस्ट अमित कलंत्री यांचा मन वाचण्याचा परफॉर्मन्स सर्वांना अचंबित करणाराहोता. शेवटी सबाली – द बँड’चा लाईव्ह म्युझिकल परफॉर्मन्स ने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढवला. या उपक्रमामुळे भारतीय सैन्यात प्रवेश घेऊ इच्छिणार्या युवकांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळाले. ‘युगांतर 2047’ हे केवळ एक सेमिनार नव्हते, तर भारताच्या तरुण पिढीला राष्ट्रनिर्माण आणि परिवर्तनाच्या आघाडीवर आणण्याचा एक महत्त्वाचा उपक्रम ठरला.

भारतीय लष्क़र ही केवळ नोकरी नाही तर ती आपली जीवनशैली आहे, ती संक़टाशी सामना करण्याची ताकद देते, जी लष्करातील प्रमुख सेनानींना घडवते, तसेच लष्क़रातील इतर कर्मचार्‍यांना शीस्त लावते. भारताचे भविष्य हे नव्या उर्जेने तरुणांचा हातात येत आहे. त्यासाठी युगातंर सारखे कार्यक्रम महत्वाचे आहेत, ही प्रेरणा प्रथम स्वामी विवेकानंद यांनी दिली आणि युवकांचे महत्व अधोरेखीत केले.
ले. जन. अनुप शिंगल, (महासंचालक लष्क़र भरती, नवी दिल्ली)

पुनीत बालन यांनी पुढाकार घेतल्याने युवा पिढीसाठी हा चांगला कार्यक्रम भारतीय लष्क़राला घेता आला. याची टॅगलाईन देखील युथ आणि योगा या धर्तीवर असून ती खुप सुंदर आहे. भारतीय स्वातंत्र्याला 2047 शंभर वर्ष पुर्ण होत आहेत. त्यासाठी युगांतर 2047 हा उपक्रम दिशादर्शक ठरेल, यात शंका नाही.
मे. जन. योगेश चौंधरी (व्हिएसएम, एडीजी, झेआरओ पुणे)

आजच्या युगात तरुण पिढी समाज माध्यामांवरच जास्त भर देत आहेत.अशा वेळी त्यांना भारतीय सैन्यदलात करिअरच्या संधी किती आहेत.हे माहिती व्हावे म्हणून युगांतर 2047 या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय लष्कराला सोबत घेत आम्ही केले.यात सुमारे तीन हजार युवक -युवतींनी सहभाग घेतला.यातून किमान दहा टक्के जारी युवकांचे आयुष्य बदलले तरी हा समाधान होईल.यातून सैन्यदलाला नवे ऑफिसर नक्कीच मिळतील, अशी आशा वाटते.

  • पुनीत बालन, अध्यक्ष,पुनीत बालन ग्रुप,
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
30.1 ° C
30.1 °
30.1 °
54 %
1.5kmh
20 %
Fri
32 °
Sat
40 °
Sun
41 °
Mon
43 °
Tue
43 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!