25.3 C
New Delhi
Sunday, August 24, 2025
Homeआरोग्यगर्भलिंगनिदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटर व रुग्णालयांवर कठोर कारवाई करा

गर्भलिंगनिदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटर व रुग्णालयांवर कठोर कारवाई करा

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांची आरोग्य मंञी प्रकाश आबिटकर यांच्याकडे मागणी

पुणे : दौंड तालुक्यातील गोपाळवाडी जिजामाता नगर परिसरात उकिरड्यावर प्लास्टिक बरण्यांमध्ये अर्भके व मानवी शरीराचे अवयव आढळून आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. एका कचरा वेचकाला पुठ्ठ्याच्या बॅाक्समध्ये अर्भके असलेल्या या बरण्या आढळल्या होत्या. दौंड पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरूद्ध गर्भपात प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या संपूर्ण प्रकरणानंतर राज्यात सोनोग्राफी सेंटर व हॉस्पिटलच्या माध्यमातून अवैधपणे गर्भलिंनिदान चाचण्या व गर्भपात सुरु असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. एकीकडे केंद्र व राज्य सरकार स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी व गर्भलिंनिदान चाचण्या रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करत आहे. दुसरीकडे मात्र अवैधपणे गर्भलिंनिदान व भ्रूणहत्या यांचे वाढलेले प्रमाण ही चिंतेची बाब आहे.

पुणे जिल्ह्यासह राज्यभरात सोनोग्राफी सेंटरमध्ये व हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीररित्या गर्भलिंगनिदान चाचण्या होत आहेत व अमानुष पद्धतीने गर्भपात घडवले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्त्रीभ्रूण हत्या जास्त प्रमाणात होत आहेत. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सोनोग्राफी सेंटर मधून गर्भनिदान चाचण्या होत आहेत का नाही याबाबत तपासण्या आणि चौकश्या होणे गरजेचे आहे. सातारा जिल्ह्यात रुग्णवाहिकेत अवैध गर्भपात केंद्र सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. असाच प्रकार राज्यात सर्वत्र दिसून येत आहे.

राज्यात गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी तसेच गर्भलिंगनिदान चाचणी करणाऱ्या सोनोग्राफी सेंटर व हॉस्पिटलवर छापेमारी करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे निवदनाद्वारे केली आहे. ज्या रुग्णालयात अथवा सोनोग्राफी सेंटरमध्ये बेकायदेशीररित्या गर्भलिंगनिदान चाचण्या केल्या जातात अश्या ठिकाणी छापेमारी करून कठोर कारवाई करण्यात येईल अश्या प्रकारच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत असे मंत्री आबिटकर यांनी सांगितल्याचे सुरवसे-पाटील म्हणाले.

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे पुणे शहर व जिल्ह्यासह राज्यातील सर्वच सोनोग्राफी सेंटरची तसेच हॉस्पिटलची तपासणी करण्यात यावी तसेच अवैधपणे गर्भलिंनिदान करून गर्भपात करणाऱ्या व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. बऱ्याचदा सोनोग्राफी सेंटरची तपासणी ही केवळ कागदोपत्री होत असते. प्रत्यक्षामध्ये तपासणी होणे व दोषी आढळणाऱ्या केंद्रांवर कारवाई होणे गरजेचे आहे.

गर्भलिंगनिदान चाचणी प्रतिबंधक कायद्याची (पीसीपीएनडीटी) कडक व प्रभावी अंमलबजावणी करून गर्भपात करणाऱ्या सोनोग्राफी सेंटर, हॉस्पिटल व यामध्ये सहभागी असणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई व्हावी व या अमानवी प्रकाराला आळा बसला पाहिजे. एखादा प्रकार समोर आल्यानंतर कारवाईचा देखावा केला जातो. त्यानंतर ‘जैसे थे’ अशीच परिस्थिती पाहायला मिळते

  • रोहन सुरवसे-पाटील
    सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
25.3 ° C
25.3 °
25.3 °
79 %
3.2kmh
18 %
Sun
31 °
Mon
31 °
Tue
35 °
Wed
37 °
Thu
37 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!