32.8 C
New Delhi
Wednesday, July 2, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानबदल ही एकमेव गोष्ट आहे जी स्थिर राहते- ...

बदल ही एकमेव गोष्ट आहे जी स्थिर राहते- डॉ. सी.जयकुमार

निकमार विद्यापीठात ‘एचआर सामिट-२०२५’ चे उद्घाटन


पुणे,- :”बांधकाम क्षेत्र भारताच्या आर्थिक विकासाचा एक महत्वाचा आधारस्तंभ म्हणून उदयास येत असून जीडीपी आणि रोजगारात महत्वपूर्ण योगदान देत आहे. आजच्या काळात बदल ही एकमेव गोष्ट आहे जी कायम स्थिर आहे.” असे विचार लार्सन अँड टुब्रोचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि कॉर्पोरेट एचआर प्रमुख डॉ.सी. जयकुमार यांनी व्यक्त केले.
निकमार विद्यापीठाने आयोजित केलेल्या एक दिवसीय ‘एचआर समिट २०२५’ च्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या प्रसंगी एचआर इन्फ्लुएंसर साहिल नायर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी निकमार विद्यापीठाचे अध्यक्ष व कुलपति डॉ. अनिल कश्यप, कुलगुरू डॉ. सुषमा एस. कुलकर्णी आणि निकमार विद्यापीठाच्या सीएसआयएएआरचे अधिष्ठाता डॉ. जर्नादन कोनेर उपस्थित होते.
डॉ. सी. जयकुमार म्हणाले,” सध्याच्या काळात या क्षेत्रात काम करणार्‍या लोकांना चपळता आणि अनुकूलता आवश्यक आहे. येथे लवचिकतेची सतत मागणी असते. बदलत्या काळानुसार, कर्मचार्‍यांवर नव्याने लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असेल. या क्षेत्रातील आव्हानात्मक काम लक्षात घेता प्रगतीसाठी नव्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. त्यामुळेच सतत शिकण्याच्या संधी असतील. नेतृत्व विकास आणि उत्तराधिकार नियोजन देखील येथे समाविष्ट आहे. तसेच विविधता, समानता आणि समावेशकता महत्वपूर्ण आहे.”
साहिल नायर म्हणाले,” निकमार विद्यापीठाचा खरा अर्थ पाहिला तर एन म्हणजे (नॅविगेटिंग चेंज ) बदलाची दिशा, आय म्हणजे ( इंटेललॅकंचुअल क्युरियॉसिटी ) बौद्धिक कुतुहलता , सी म्हणजे ( करेज )धैर्य, एम म्हणजे (मास्टरींग अजिलिटी अडॅप्टबिलिटी) वर्चस्व, ए म्हणजे (ऑथेंटिसिटी) प्रामाणिकपणा आणि आर म्हणजे ( रेझिलिअन्स ) लवचिकता. हे येथील विद्यार्थ्यांमध्ये रूजविले जाते. जर एखाद्याला कोणत्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल तर ज्ञानासोबतच काम करण्याची जुनी पद्धत बदलून नवीन मार्गाचा अवलंब करावा लागेल. हे देशातील एकमेव विद्यापीठ आहे जिथे ९० टक्यांहून अधिक प्लेसमेंट होतात.


डॉ. अनिल कश्यप म्हणाले,” देशाच्या जीडीपीमध्ये बांधकाम क्षेत्राचा वाटा ९ ते १० टक्के आहे. हे देशातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे रोजगार देणार क्षेत्र आहे. म्हणूनच राष्ट्र उभारणीसाठी हे क्षेत्र सर्वात महत्वाचे असल्याने, त्यात निकमार ची भूमिका महत्वाची ठरेल. येथून कुशल मनुष्यबळ तयार होतात. भविष्याचा वेध घेतांना कृत्रिम बुद्धिमत्ता, बांधकाम तंत्रज्ञान, डिजिटल, थ्रीडी प्रिटिंग आणि संशोधन यांना अधिक महत्व दिले जाईल.”
डॉ. सुषमा एस कुलकर्णी म्हणाल्या,” बांधकाम क्षेत्रातील आव्हानांना तोंड देण्यासाठी उच्चशिक्षित तरूणांची गरज आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन, निकमार विद्यापीठ जागतिक स्तरावरील बांधकामासाठी वचनबद्ध आहे. येत्या काळात ऊर्जा, पर्यावरण, नागरी, वास्तुकला आणि सामान्य व्यवस्थापन यासारख्या विषयांमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस आहे.”
या दिवसभराच्या समिटमध्ये चार महत्वाच्या पॅनेलवर चर्चा झाली. ज्यामध्ये कार्यबल परिवर्तन, कौशल्य विकासात शिक्षणाची भूमिका, नोकरीवर एआयचा परिणाम आणि करिअरमध्ये यशासाठी आवश्यक कौशल्ये यासारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
हे समिट विद्यार्थ्यांसाठी वास्तविक जगातील उद्योग अंतर्दृष्टी मिळविण्यासाठी आणि आघाडीच्या व्यावसायिकांशी नेटवर्किंग करण्यासाठी एक अद्वितीय व्यासपीठ ठरले.
डॉ. जर्नादन कोनेर यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
32.8 ° C
32.8 °
32.8 °
61 %
3.8kmh
26 %
Wed
37 °
Thu
39 °
Fri
38 °
Sat
35 °
Sun
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!