26.5 C
New Delhi
Thursday, October 9, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानडॉल्बी लॅबोरेटरीज डॉल्बी सिनेमा भारतात घेऊन येणार

डॉल्बी लॅबोरेटरीज डॉल्बी सिनेमा भारतात घेऊन येणार

 
पुणे – एक गुंतवून ठेवणारा अनुभव देणाऱ्यांत अग्रणी डॉल्बी लॅबोरेटरीज इंक. या आघाडीच्या कंपनीने जाहीर केले आहे की या वर्षी ते डॉल्बी सिनेमा भारतात घेऊन येणार आहेत. सिनेमा बघण्याच्या उत्कृष्ट अनुभवाच्या नव्या युगाची ही सुरुवात असेल. भारतात सर्वप्रथम डॉल्बी सिनेमा स्क्रीन सुरू करणाऱ्या पहिल्या सहा एक्झिबिटर्स मध्ये पुण्यातील सिटी प्राइड, हैदराबाद येथील अल्लू सिनेप्लेक्स, त्रिचीमधील एल ए सिनेमा, बंगळूर येथील एएमबी सिनेमाज, कोचीमधील ईव्हीएम सिनेमाज आणि उलिक्कल येथील जी सिनेप्लेक्स यांचा समावेश आहे.
 
डॉल्बी सिनेमा (dollby cinema) भारतीय प्रेक्षकांची चित्रपटाचा अनुभव घेण्याची रीत पार बदलून टाकेल. निर्मात्याला अपेक्षित असेल, अगदी त्याच स्वरूपात प्रेक्षकांना चित्रपट बघण्याची आणि ऐकण्याची संधी मिळेल. या महत्त्वाच्या टप्प्यामुळे भारतात सिनेमाचा प्रीमियम अनुभव घेण्याबाबत नवीन मापदंड स्थापित होईल त्याचबरोबर इनोव्हेशनच्या माध्यमातून मनोरंजनाची गुणवत्ता वाढवण्याच्या डॉल्बीच्या वचनबद्धतेस देखील बळकटी मिळेल.
 
चित्रपट रसिकांना सिनेमाचा प्रीमियम अनुभव देण्यासाठी डॉल्बी सिनेमा अप्रतिम चित्र आणि आवाज यांची सांगड घालते. डॉल्बी व्हिजनमुळे चित्र जिवंत होते. त्यातील अद्भुत चमक आणि अधिक गहिरा गडदपणा यामुळे चित्र पडद्यावर सजीव होते. इतर चित्रपट स्क्रीन्सच्या तुलनेत गहिरेपण, रंग आणि बारीक सारिक तपशील या बाबतीत ते वरचढ ठरते. स्टुडिओ कक्षेचे डॉल्बी अॅटमॉस प्रेक्षकांना थेट कथानकाच्या मध्यातच घेऊन जाते आणि ध्वनीलहरी त्यांच्या आसपास, अगदी डोक्यावर देखील तरंगत राहतात. सिनेमातील साऊंड प्रेक्षकांना सर्व बाजूंनी वेढून घेतो, ज्यामुळे पडद्यावर घडणारी गोष्ट प्रत्यक्षात घडत असल्याचा अनुभव त्याला येतो. डॉल्बी सिनेमा चित्रपट दिग्दर्शकाचा मानस नीट ओळखतो. तो चित्रपट रसिकाला चित्रपटाच्या घडामोडींच्या मध्यात ठेवतो. डॉल्बी सिनेमा डिझाईनसह चित्रपटगृहातील सर्व सीट्स अनुकूल बनवलेल्या असतील, ज्या प्रेक्षकांना ‘आपली सीट सर्वात छान’ असल्याचा अनुभव देतील.
 
वर्ल्डवाइड सिनेमा सेल्स अँड पार्टनर मॅनेजमेंट, डॉल्बी लॅबोरेटरीजचे व्हाईस प्रेसिडेंट मायकल आर्चर म्हणाले, “भारतात डॉल्बी सिनेमाची सुरुवात हा देशाच्या मनोरंजन क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा क्षण आहे. भारतीय प्रेक्षकांना चित्रपटांचे वेड असते आणि डॉल्बी सिनेमा त्यांना चित्रपटाचा अप्रतिम अनुभव देईल. २०१४ मध्ये पहिला डॉल्बी सिनेमासुरू झाल्यापासून डॉल्बी सिनेमा झपाट्याने वाढला आहे, ३५ एक्झिबिटर पार्टनर्स आणि १४ देशांमध्ये त्याचा प्रसार आहे. प्रस्तुत घडामोडीमधून मनोरंजनाचा असामान्य अनुभव देण्यासाठी दिग्दर्शक, स्टुडिओज आणि एक्झिबिटर्स यांच्यासोबतीने सिनेमॅटिक कथाकथन सुधारण्याची आमची वचनबद्धता अधोरेखित झाली आहे.”
 
डॉल्बी सिनेमा भारतात आणण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम सुनिश्चित करतो की, चित्रपट निर्मात्यांना जागतिक पातळीच्या पोस्ट-प्रॉडक्शन सुविधांपर्यंत पोहोच मिळेल. भारतातील 24 डॉल्बी अॅटमॉस थेटरिकल मिक्स सुविधांव्यतिरिक्त, डॉल्बीने अलीकडे सिनेमासाठी पहिली डॉल्बी व्हिजन कलर ग्रेडिंग सुविधा उभारण्यासाठी हैदराबाद येथील अन्नपूर्णा स्टुडिओजशी सहयोग केला आहे. ही सुविधा भारतीय चित्रपट निर्मात्यांना त्यांचे व्हिज्युअल स्टोरीटेलिंग अधिक चांगले बनवण्यासाठी अत्याधुनिक साधने प्रदान करून सक्षम बनवते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
26.5 ° C
26.5 °
26.5 °
61 %
2.1kmh
0 %
Thu
30 °
Fri
32 °
Sat
33 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!