27.9 C
New Delhi
Monday, July 7, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानपॅरागॉन ने नवीन टीव्‍हीसी कॅम्‍पेनमध्‍ये 'जिद, चलते रहने की' नवीन मोहिम केली...

पॅरागॉन ने नवीन टीव्‍हीसी कॅम्‍पेनमध्‍ये ‘जिद, चलते रहने की’ नवीन मोहिम केली लाँच

पुणे, – : पॅरागॉन ५० व्‍या वर्षामध्‍ये प्रवेश करत असताना भारतातील या सर्वात विश्‍वसनीय फूटवेअर ब्रँडने नवीन मोहिम लाँच केली आहे, जी ब्रँडचा मुलभूत विश्‍वास: ‘जिद, चलते रहने की’ला दर्शवते. ही जाहिरात जीवनात शांतमय संकल्‍पासह पुढे जाणाऱ्या, त्‍यांच्‍या कुटुंबियांसाठी उज्‍ज्‍वल भविष्‍याची आशा बाळगणाऱ्या भारतीयांच्‍या प्रेमळ उत्‍साहाला मानवंदना आहे.

ब्रँड्सना वैशिष्‍ट्ये व किमतींसाठी ओळखले जाणाऱ्या काळामध्‍ये पॅरागॉन पॉज घेत अधिक मुलभूत बाब दाखवत आहे, ती म्‍हणजे प्रत्‍येक पावलामागील मानवी गाथा. सामान्य भारतीयांच्या वास्तवात रुजलेली ही मोहीम आपल्या मुलीचे चांगले भविष्य घडवण्यासाठी धडपडणाऱ्या वडिलांच्या दैनंदिन प्रयत्‍नांना सादर करते, ज्यामध्ये स्थिरता आणि प्रेमाचे भावनिक नाते दिसून येते.

”ही मोहिम पॅरागॉनला नव्‍या उंचीवर नेलेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या जीवनात खोलवर रूजलेली आहे,” असे पॅरागॉन फूटवेअरच्‍या मार्केटिंग अँड आयटीचे कार्यकारी उपाध्‍यक्ष सचिन जोसेफ म्‍हणाले. आम्‍ही ५० वर्षे पूर्ण करत असताना आमची शांत हिरोजचा, म्‍हणजेच दररोज उद्देश व स्थिरतेसह चालत राहणाऱ्या व्‍यक्‍तींचा सन्‍मान करण्‍याची इच्‍छा होती. ही जाहिरात त्‍यांच्‍या प्रवासाला सादर करते, तसेच या जाहिरातीमधून त्‍यांच्‍यासोबत चालण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.”

”आमची अडथळ्यांना दूर करत आशावादाने प्रेरित ब्रँडच्‍या निर्धाराच्‍या विश्‍वासामध्‍ये रूजलेल्‍या गोष्‍टींवर फोकस करण्‍याची महत्त्वाकांक्षा होती. हे कथानक सामान्‍य माणसाच्‍या अविरत उत्‍साहाला सादर करते, जो स्‍वत:साठी नाही तर त्‍याच्‍या प्रियजनांसाठी दररोज आनंदाने पुढे जात आहे,” असे टर्मरिकचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल गुहा म्‍हणाले.

पॅरागॉन पाच दशकांच्‍या वारसाला साजरे करत असताना ही मोहिम सेलिब्रेशनसोबत आठवण करून देते की फूटवेअर बदलू शकतात, पण ब्रँडची भारतीयांसोबत चालत राहण्‍याप्रती कटिबद्धता कधीच बदलणार नाही

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
light rain
27.9 ° C
27.9 °
27.9 °
82 %
3.2kmh
100 %
Mon
35 °
Tue
37 °
Wed
37 °
Thu
31 °
Fri
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!