मुंबई : अभिनय क्षेत्रात नेहमीच विविध प्रयोग करणारी अभिनेत्री अमृता सुभाष (Amruta Subhash new movie)आता एक नवीन आणि थरारक भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. हृषीकेश गुप्ते दिग्दर्शित ‘जारण’ या आगामी मराठी भयपटात अमृता प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले असून, त्यातील अमृता सुभाषचा रहस्यमय चेहरा प्रेक्षकांच्या कुतूहलाला अधिकच चालना देत आहे.
पोस्टरमध्ये अमृता सुभाषच्या चेहऱ्यावर टाचण्या टोचलेल्या दिसतात आणि तिचे डोळे काहीतरी गंभीर सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्टपणे जाणवते. हा चित्रपट मानवी भावना आणि दुहेरी आयुष्याचा शोध घेणारा असून, त्यात दडलेली रहस्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवतील, असे निर्मात्यांचे म्हणणे आहे.

या भूमिकेबाबत बोलताना अमृता म्हणते, “माझ्या इतर भूमिकांच्या तुलनेत ही भूमिका अधिकच आव्हानात्मक होती. ‘जारण’चं (Jaran movie poster) स्क्रिप्ट वाचल्यावरच मी हा चित्रपट करायचा ठरवलं. ही रहस्यमय कथा प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवेल, याची मला खात्री आहे.”
ए अँड सिनेमाज एलएलपी प्रस्तुत आणि ए3 इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिसेस निर्मित ‘जारण’ ६ जून (Marathi horror thriller film) रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केले असून, अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांची निर्मिती आहे.