पुणे , : पुणे व परिसरातील अग्रगण्य नेत्ररोग रुग्णालय असलेल्या देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर यांच्या वतीने, त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी म्हणून कोथरूड, पिरंगुट, देहूगाव व वारजे येथील शाखांमध्ये मोफत नेत्रतपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. या उपक्रमाला पुणेकर नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरामध्ये १०,००० हून अधिक रुग्णांची मोफत डोळ्यांची तपासणी करण्यात आली आणि हजारो रुग्णांनी शस्त्रक्रियेचा लाभ घेतला. अत्याधुनिक यंत्रणा, आधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे हे शिबीर यशस्वी झाले.
रुग्णांनी सर्व नेत्ररोग सेवा एकाच छताखाली उपलब्ध असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. खर्च परवडत नसल्यामुळे उपचार घेता न येणाऱ्या अनेक रुग्णांना या शिबिरामुळे दिलासा मिळाला.
सवलतीच्या दरात उपलब्ध असलेल्या तपासण्यांमध्येही रुग्णांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.रोबोटिक फेम्टो मोतीबिंदू व फेम्टो लॅसिक सारख्या अत्याधुनिक शस्त्रक्रियांविषयी माहिती घेऊन अनेकांनी हे उपचार करून घेतले.
डाॅ. आनंद देशपांडे, संचालक व प्रसिद्ध कॅटॅरॅक्ट व रिफ्रॅक्टिव्ह सर्जन, यांनी या शिबिरात स्वतः लक्ष केंद्रित करून रुग्णांना त्वरित व अचूक निदान मिळेल याची खात्री केली ते पुढे म्हणाले की गेल्या ९ वर्षांपासून आम्ही वर्धापनदिनानिमित्त मोफत शिबिराच्या माध्यमातून समाजऋण फेडण्याचा प्रयत्न करत आहोत. भविष्यातही उच्च दर्जाची व अत्याधुनिक नेत्रसेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.