25.3 C
New Delhi
Sunday, August 24, 2025
Homeआरोग्यसंत निरंकारी मिशन कडून मानव एकता दिवसाचे आयोजन

संत निरंकारी मिशन कडून मानव एकता दिवसाचे आयोजन

संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी सह देश-विदेशात ५०० ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन


 भोसरी,- आध्यात्मिकताच मानव एकता मजबूत करु शकते तसेच मानवाला मानवाच्या जवळ आणून परस्पर प्रेम व सौहार्दाचे वातावरण निर्माण करु शकते. हेच उद्दिष्ट समोर ठेऊन सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या आशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी २४ एप्रिल, २०२५ रोजी दिल्लीतील ग्राउंड नं.८, निरंकारी चौक, बुराडी रोड येथे ‘मानव एकता दिवस’ समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त देशभरातील मिशनच्या समस्त शाखांमधील भाविक भक्तगणदेखील एकत्रित येऊन बाबा गुरबचनसिंहजी आणि मिशनचे अनन्य भक्त चाचा प्रतापसिंहजी यांना आपली श्रद्धा सुमने अर्पित करतील व त्यांच्या महान जीवनातून प्रेरणा प्राप्त करतील.
            संत निरंकारी मंडळाचे सचिव व समाज कल्याण विभागाचे प्रभारी आदरणीय श्री जोगिंदर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले, की सदगुरुंच्या असीम कृपेने यावर्षी देखील जगभरातील सुमारे ५०० पेक्षा अधिक ठिकाणी संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन च्या विद्यमाने रक्तदान शिबिरांच्या अविरत श्रृंखलेचे व्यापक आयोजन केले जाईल ज्यामध्ये जवळपास ५०,००० पेक्षा अधिक रक्तदाते मानवतेच्या भल्यासाठी रक्तदान करुन नि:स्वार्थ सेवेचे उदाहरण प्रस्तुत करतील.
            उल्लेखनीय आहे, की स्थानिक स्तरावर संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी येथे गुरुवार दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८ ते सायं. ५ या वेळात भव्य रक्तदान शिबिराचे (blood camp)आयोजन करण्यात आले असून रक्त संकलन करण्यासाठी विविध रुग्णालयाच्या प्रशिक्षित डॉक्टर व वैद्यकीय तज्ञांच्या टीम सहभागी होतील ज्यामध्ये वाय.सी.एम. रुग्णालय रक्तपेढी,ससून रुग्णालय रक्तपेढी, तसेच संत निरंकारी रक्तपेढी विलेपार्ले ची टीम देखील अंतर्भूत असेल. मानव एकता दिवसाच्या निमित्ताने याच ठिकाणी सायंकाळी ६.०० ते ९.०० यावेळेत विशाल सत्संग समारोहाचे ही आयोजन करण्यात आले आहे.
            हे सर्वविदित आहे, की युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी महाराज समाज कल्याणासाठी सातत्याने प्रयासरत राहिले. प्रत्येक भक्ताच्या जीवनाला त्यांनी वास्तविक रूपात एक व्यावहारिक दिशा प्रदान केली ज्यासाठी मानवता त्यांची सदैव ऋणी राहील.  युगदृष्टा बाबा हरदेव सिंह जी यांनी सन् १९८६ पासून सुरु केलेली रक्तदान अभियानाची ही मोहीम आज महाअभियानाच्या रुपात आपल्या चरम उत्कर्ष बिंदूवर पोहचली आहे. मागील जवळपास ४ दशकांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ८६४४ शिबिरांमध्ये मिशनमार्फत १४,०५,१७७ युनिट रक्त मानवमात्राच्या भल्यासाठी दिले गेले आहे आणि या सेवा निरंतर चालू आहेत. निश्चितच लोककल्याणार्थ चालविण्यात येत असलेले हे अभियान निरंकारी सदगुरुंकडून प्रदत्त शिकवणुकीचे दर्शन घडवत असून एक दिव्य संदेश प्रसारित करत आहे ज्यायोगे प्रत्येक मनुष्य प्रेरणा प्राप्त करुन आपले जीवन कृतार्थ करत आहे.
            संत निरंकारी मिशनचे स्वयंसेवक भोसरी आणि दिघी परिसरात घराघरामध्ये जाऊन तसेच दत्तगड पायथा, मॅगझीन चौक, भोसरी चौक, स्पाईन सर्कल अशा अनेक गर्दीच्या ठिकाणी जाऊन नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करत आहेत. ‘रक्तदान श्रेष्ठदान’ या उक्तीप्रमाणे आपण सर्वानी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन संत निरंकारी मिशनद्वारे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
25.3 ° C
25.3 °
25.3 °
79 %
3.2kmh
18 %
Sun
31 °
Mon
31 °
Tue
35 °
Wed
37 °
Thu
37 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!