27.5 C
New Delhi
Thursday, October 9, 2025
Homeआरोग्यफोनपेच्या पिनकोड ॲपतर्फे २४ तास औषध डिलिव्हरी सेवेची घोषणा

फोनपेच्या पिनकोड ॲपतर्फे २४ तास औषध डिलिव्हरी सेवेची घोषणा

पुणे- : फोनपेचे पाठबळ लाभलेल्या पिनकोड या हायपरलोकल ई-कॉमर्स ॲप्लिकेशन ॲपतर्फे आता बंगळुरू, मुंबई व पुणे या शहरांमध्ये २४ तास ऑनलाइन फार्मसी सेवा सुरू केली आहे. या सेवेच्या माध्यमातून आवश्यक औषधे २४ तास कधीही मिळू शकतात. ग्राहक आता कोणत्याही वेळेस औषधांची ऑर्डर देऊ शकतात आणि जवळच्या स्थानिक औषधाविक्रेत्यांकडून केवळ १० मिनिटांत औषधांची डिलिव्हरी मिळवू शकतात.
ज्यांच्याकडे डॉक्टरांची चिठ्ठी नाही, अशा ग्राहकांसाठी पिनकोड ॲपच्या माध्यमातून पात्र डॉक्टरांचा मोफत ऑनलाईन सल्ला घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. तपासणीनंतर हे डॉक्टर टेलिमेडिसिनच्या मार्गदर्शक सूचनांनुसार डिजिटल प्रिस्क्रिप्शन देऊ शकतात. त्यामुळे औषधे मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि कार्यक्षम होते.

प्रिस्क्रिप्शन नसलेल्या ग्राहकांना, पिनकोड ॲप सर्वात पहिले त्यांना कार्टमध्ये औषधे जोडण्याची आणि ‘नो प्रिस्क्रिप्शन’ पर्याय निवडून ऑर्डर देण्याची परवानगी देतो. ऑर्डर दिल्यानंतर, एक पात्र डॉक्टर काही मिनिटांतच मोफत टेलिकॉन्सल्टेशनसाठी ग्राहकाशी संपर्क साधेल . मूल्यांकनाच्या आधारे, टेलिमेडिसिन मार्गदर्शक तत्त्वांनुसार डिजिटल प्रिस्क्रिप्शन जारी करण्यात येते – ज्यामुळे एक सुसंगत आणि विनाअडथळा औषध खरेदी करता येतात.

पिनकोड अॅप डार्क स्टोअर्सचा (अशी गोदामे जिथे ग्राहकांना प्रत्यक्ष खरेदी करता येत नाही, फक्त ऑनलाइन ऑर्डरसाठीच तिथून माल डिलिव्हर केला जातो.) वापर करण्याऐवजी स्थानिक मेडिकल दुकानांसोबत विशेष भागीदारी करून ऑनलाइन फार्मसी क्षेत्रात क्रांती घडवत आहे. हा दृष्टिकोन केवळ जलद डिलिव्हरी सुलभ करत नाही तर परिसरातील मेडिकल दुकानांना आधार देखील प्रदान करतो, ज्यामुळे वाढत्या डिजिटल मार्केटप्लेसमध्ये त्यांचा व्यवसाय वाढण्यास मदत होते.

पिनकोडचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक लोहचेब म्हणाले, “आरोग्यसेवा अधिक सुलभ आणि सोयीची करणे आणि त्याच वेळी स्थानिक फार्मसींना सक्षम करणे, हे आमचे मिशन आहे. आमच्या १० मिनिटांच्या डिलिव्हरी सर्व्हिसच्या माध्यमातून ग्राहकांना कोणत्याही अनावश्यक विलंबाशिवाय आवश्यक औषधे मिळण्याची खात्री मिळते. आमची कायम उपलब्धता आणि मोफत डॉक्टर ऑन कॉलद्वारे, आम्ही प्राथमिक आरोग्यसेवेच्या उपलब्धतेत सुधारणा घडवत आहोत आणि डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये त्या त्या परिसरातील औषधविक्रेत्यांचे स्थान अधिक भक्कम करत आहोत. या दृष्टिकोनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेच्या वाढीला चालना मिळत आहे आणि विश्वासार्ह स्थानिक औषधविक्रेते हे समाजाचे महत्त्वाचे घटक ठरतात.”

पिनकोड ॲप पारंपरिक ई-फार्मसींपेक्षा वेगळी भूमिका घेते आणि हायपरलोकल धोरणाचा अवलंब करते. या अंतर्गत जवळपासच्या औषधविक्रेत्यांकडून थेट औषधे घेण्यात येतात. या पद्धतीमुळे अधिक वेगवान डिलिव्हरी होते आणि स्थानिक व्यवसाय डिजिटल उपलब्धतेच्या आघाडीवर राहतात. पिनकोड ॲप हे एकमेव ॲप आहे जे २४ तास सेवा देते, डॉक्टरांचा मोफत सल्ला मिळवून देते आणि स्थानिक फार्मसींसोबत भागीदारी करून औषधांची झटपट डिलिव्हरी करते.वेळेची मर्यादा असलेल्या किंवा हालचाल करण्यात अडचण असलेल्या व्यक्तींसाठी ही सेवा उपयुक्त आहे. किरकोळ, तातडीची किंवा दीर्घकालीन उपचारांसाठी लागणारी औषधे मिळवण्यासाठी या सेवेची मदत होते. यामुळे स्थानिक औषधविक्रेत्यांचा व्यवसायही वाढतो. पिनकोड ॲपवर औषधांच्या किंमती वाजवी आहेत. स्थानिक फार्मसींकडून मिळणाऱ्या सवलती ग्राहकांना थेट दिल्या जातात. डिलिव्हरीसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
27.5 ° C
27.5 °
27.5 °
40 %
3.3kmh
0 %
Thu
28 °
Fri
31 °
Sat
32 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!