मुंबई, – के.एल राहुलने पुन्हा एकदा आपली चमकदार फलंदाजी (IPL Records 2025)सिध्द केली आहे. लखनौ येथे खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 40 व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सच्या या स्टार फलंदाजाने ऐतिहासिक कामगिरी केली. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध षटकार खेचत राहुलने दिल्लीला आठ विकेट्सनी विजय मिळवून दिला आणि त्याचबरोबर आयपीएलमध्ये सर्वात जलद 5000 धावा पूर्ण करण्याचा पराक्रम साधला.

शानदार अर्धशतकाने विजयाकडे नेले
राहुलने 42 चेंडूत नाबाद 57 धावांची प्रभावी खेळी साकारली. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार आणि तीन षटकारांची आतषबाजी केली. दिल्लीने लखनौचा 160 धावांचे लक्ष्य केवळ 13 चेंडू राखून गाठले आणि या महत्त्वाच्या विजयासह 12 गुण मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.
ऐतिहासिक विक्रम: सर्वात कमी डावात 5000 धावा
केएल राहुलने (IPL 2025 Playoffs Race)केवळ 130 डावांमध्ये आयपीएलमध्ये 5000 धावा पूर्ण केल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर होता, ज्याने 135 डावांत ही कामगिरी केली होती. विराट कोहलीने 157 डाव, एबी डिव्हिलियर्सने 161 डाव, आणि शिखर धवनने 168 डावात हा टप्पा गाठला होता. राहुलने हे विक्रमी यश मिळवत आपल्या नावावर नवा इतिहास लिहिला आहे.
आयपीएलमध्ये सर्वात कमी डावांमध्ये 5000 धावा करणारे खेळाडू:
- केएल राहुल: 130 डाव
- डेव्हिड वॉर्नर: 135 डाव
- विराट कोहली: 157 डाव
- एबी डिव्हिलियर्स: 161 डाव
- शिखर धवन: 168 डाव
- सुरेश रैना: 173 डाव
- रोहित शर्मा: 187 डाव
- एमएस धोनी: 208 डाव
प्लेऑफच्या दिशेने दिल्लीची घोडदौड
दिल्ली कॅपिटल्ससाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. संघ आता 12 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि फक्त दोन विजय दूर आहे प्लेऑफ स्थानापासून. आयपीएल 2025 स्पर्धा आता निर्णायक वळणावर आली असून प्रत्येक सामना नवा थरार निर्माण करत आहे.
राहुलची नेतृत्वक्षमता आणि फॉर्म – दिल्लीसाठी आशेचा किरण
केएल राहुलची संयमित आणि आक्रमक फलंदाजी दिल्लीसाठी विजयाचा आधारस्तंभ ठरत आहे. त्यांच्या फॉर्ममुळे संघाचे मनोबल उंचावले आहे आणि आगामी सामन्यांत दिल्लीकडून अधिक चुरसदार कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.
